Advertisements
Advertisements
प्रश्न
गुरुत्व त्वरण 'g' चे मूल्य कोणत्या घटकांवर अवलंबून असते ते स्पष्ट करा.
दीर्घउत्तर
उत्तर
पृथ्वीच्या गुरूत्व त्वरणाचे मूल्य 'g' वर परिणाम करणारे घटक पुढीलप्रमाणे:
- पृथ्वीचा आकार:
- पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलसर नसून, ती ध्रुवांजवळ थोडी चपटी आणि विषुववृत्ताजवळ थोडी फुगीर आहे.
- यामुळे पृथ्वीची त्रिज्या ध्रुवांजवळ कमी आणि विषुववृत्ताजवळ अधिक असते.
- म्हणून, g चे मूल्य ध्रुवांवर सर्वाधिक म्हणजे 9.83201 m/s2 असते आणि विषुववृत्ताकडे जाताना कमी होत जाते. विषुववृत्तावर g चे मूल्य सर्वात कमी म्हणजे 9.78015 m/s2 असते.
- उंची:
- जसे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एखाद्या वस्तूची उंची वाढते, तसे त्या वस्तू आणि पृथ्वीच्या केंद्रामधील अंतर (r) देखील वाढते.
- उंची वाढल्यामुळे g चे मूल्य कमी होते. जर वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत खूपच कमी असेल, तर उंचीमुळे होणारा बदल नगण्य असतो.
- खोली:
- पृथ्वीच्या पृष्ठभागावर g चे मूल्य सर्वाधिक असते.
- जसे एखाद्या वस्तूची खोली वाढते, तसे त्या वस्तू आणि पृथ्वीच्या केंद्रामधील अंतर (r) कमी होते.
- अंतर कमी होत असतानाच, वस्तूवर गुरुत्वीय बल लागू करणारा पृथ्वीचा भाग (M) देखील कमी होतो.
- r आणि M मधील बदलांच्या संयुक्त परिणामामुळे, आपण पृथ्वीच्या आत खोलवर गेल्यावर g चे मूल्य कमी होते.
- पृथ्वीच्या केंद्रस्थानी g चे मूल्य पूर्णतः शून्य असते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?