मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

घरपोच तिकिटे मागितल्याप्रमाणे न मिळाल्याबाबत संबंधित व्यक्तिकडे तक्रार करा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

घरपोच तिकिटे मागितल्याप्रमाणे न मिळाल्याबाबत संबंधित व्यक्तिकडे तक्रार करा.

लघु उत्तर

उत्तर

दि. ४ नोव्हेंबर, २०१९.

प्रति,
अ. ब. क.
माननीय आयोजक,
'सरगम' संस्था,
अमरावती

विषयः 'दिवाळी पहाट' साठी मागवलेल्या तिकिटांसंदर्भात तक्रार.

महोदय,

आपणांस कळवण्यास खेद वाटतो, की आपली संस्था 'सरगम' ने दि. २ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या 'दिवाळी पहाट' या कार्यक्रमाची २० तिकिटे मी घरपोच मागवली होती, ती अजूनही मिळालेली नाहीत. रसिक श्रोत्यांच्या मागणीकडे अशाप्रकारे दुर्लक्ष करणे किंवा याबाबत निष्काळजीपणा करणे ही संतापजनक बाब आहे.

आपणास नम्र विनंती आहे, की एका सुरेल कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याची आमची तीव्र इच्छा आपण पूर्ण करावी आणि या कार्यक्रमाच्या पुढील प्रयोगाची तिकिटे घरपोच पाठवण्याची व्यवस्था करावी.
कृपया या निष्काळजीपणाची योग्य ती दखल घ्यावी ही विनंती.

आपला विश्वासू,
राजू देशपांडे
रूबल सोसायटी,
आसेपूर्णा,
अमरावती

shaalaa.com
उपयोजित लेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 16.3: उपयोजित लेखन - पत्रलेखन [पृष्ठ ६४]

APPEARS IN

बालभारती Marathi 9 Standard Maharashtra State Board
पाठ 16.3 उपयोजित लेखन
पत्रलेखन | Q २. (२) | पृष्ठ ६४

संबंधित प्रश्‍न

खालील निवेदन वाचा व संबंधित विषयासाठी स्वपरिचय पत्र तयार करा.

महात्मा फुले विद्यालय बुलढाणा
आंतरशालेय नाट्यमहोत्सवातील स्पर्धांसाठी
एकपात्री प्रयोग कलाकारांची निवड
इच्छुक विद्यार्थ्यांकडून स्व-परिचयपत्र
मागविण्यात येत आहे.

नाट्यविभाग प्रमुख

अंतिम दिनांक दि.२६ डिसेंबर

पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक

 

स्वपरिचय पत्राचे मुद्दे

(१) संपूर्ण नाव          

(२) पत्ता                 

(३) संपर्क क्रमांक    

(४) जन्मतारीख        

(५) शैक्षणिक पात्रता/विशेष प्रशिक्षण

(६) छंद

(७) अनुभव/पारितोषिक

(८) इतर कलांमधील प्रावीण्


कार्यक्रमाची तिकिटे संपल्यामुळे हाच कार्यक्रम पुन्हा सादर करण्याची मागणी करणारे पत्र लिहा.


खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

(अ) चौकट पूर्ण करा.

(आ) जाहिरातीतील काही मजकूर चुकीचा वाटतो का? सकारण नमूद करा.

(इ) वरील जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल?


खालील जाहिरातीचे अधिक आकर्षक स्वरुपात पुनर्लेखन करा.


दिलेल्या सूचना वाचा व तुम्ही व तुमचा मित्र यांच्यातील संवाद लिहा.

विद्यार्थ्यांसाठी सूचना

जागतिक पर्यावरणदिनानिमित्त
‘आनंदनिकेतन’ या वृक्षवाटिकेतर्फे

वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

इच्छुक विद्यार्थ्यांनी २५ एप्रिलपर्यंत वर्गशिक्षकांकडे आपली नावे नोंदवावीत व ५ जूनला सकाळी ७.३० ला शाळेत जमावे.

टीप:- येताना उन्हाळी सुट्टीत जमवलेल्या फळबिया सोबत आणाव्यात.


¤ स्वच्छता अभियान कार्यक्रम ¤

२ ऑक्टोबर आष्टी जि. चंद्रपूर येथील शारदा विद्यालयात महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न झाला. या दिवशीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. जयंत करोडे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापकांनी भूषवले.

इयत्ता आठवी ते दहावी साठी ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धाआयोजित केली होती. अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी परिसरात ‘स्वच्छता अभियान’ राबवले. प्रमुख पाहुण्यांनी ‘माझी शरीर स्वच्छता आणि आहार’ या विषयावर उत्तम उद्बोधन केले. प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकांना बक्षिसे देण्यात आली. अध्यक्षीय भाषणानंतर श्री. गावंडे सरांनी आभारप्रदर्शन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला.

वरील वृत्तांत वाचा व त्यासाठीची कृती तयार करा.


प्रसंगलेखन-

खालील बातमी वाचा.

वरील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता. त्या भावपूर्ण प्रसंगाचे लेखन करा.


आत्मकथन-

खालील दिलेला महामार्गावरील सूचनाफलक तुमच्याशी बोलतो आहे, अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मकथन लिहा.

♦ वाहने हळू चालवा.
♦ पुढे एक किलोमीटरचा घाट आहे.
♦ गरज पडेल तेव्हा कर्णभोंगा वाजवा.
♦ गतिरोधकावर वाहनाची गती कमी करा.
♦ वाहन चालवतांना भ्रमणध्वनी बंद ठेवा.
♦ लक्षात ठेवा - ‘नाही पेक्षा उशीर बरा’.


खालील मुद्द्यांच्या आधारे लेखन करा.


कंदील व विजेरी (बॅटरी) यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

 

 


गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या तुमच्या मित्राची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.


खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

शब्दजाल पूर्ण करा.


खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

वरील जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल?


खालील बातमी वाचा.

वरील सोहळ्याला तुम्ही उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.


शब्दसमूह, वाक्प्रचार व म्हणी यांचा वापर करून उतारा तयार करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×