Advertisements
Advertisements
प्रश्न
‘होळी’च्या सणाची तयारी तुम्ही कशी कराल ते लिहा.
उत्तर
होळीच्या सणाला पुरणपोळी बनवण्यासाठी मी आईला मदत करेन. पुरणाचे गोळे तयार करणे, वेलची सोलून देणे अशी बारीकसारीक कामे मी करेन. शिवाय, आमच्या इमारतीत लहानशी होळी पेटवली जाते. लोक स्वत: जवळचे जुने आणि टाकाऊ लाकडी सामान, करवंट्या वगैरे जाळण्यासाठी देतात, ते गोळा करण्याचे काम करेन. सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांना होळीसाठी बोलावून आणेन. वृक्ष तोडण्यापेक्षा वृक्षांचे संवर्धन व्हावे यासाठी मोठ्या माणसांच्या मदतीने 'झाडे लावा, झाडे जगवा' हा उपक्रम राबवून त्यात सर्व लोक सहभागी होतील, यासाठी मदत करेन. निसर्गातून मिळणारी प्रत्येक वस्तू काटकसरीने वापरण्याचा संकल्प करेन व इतरांनाही तसे करण्यासाठी तयार करेन. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या पथनाट्यांत सहभागी होईन.
संबंधित प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
विजा केव्हा चमकल्या?
पापड कशाकशापासून बनवले जातात याची माहिती आईला विचारून लिहा.
उन्हाळ्यामध्ये वाळवून साठवण्याचे कोणकोणते पदार्थ आई करते ते लिहा. उदा., पापड.
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
अवकाशी विहरणारा -
घरात हव्या भावना ओल्या-म्हणजे
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
केरकचरा टाकायचे ठिकाण -
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवीने होळीच्या दिवशी कोणती शपथ घ्यायला सांगितली आहे?
पाणपोई हा पाण्याशी संबंधित शब्द आहे. तसेच खालील शब्द वाचा व समजून घ्या.
पाराची वाडी या गावातील मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल तुमचे मत सांगा.
अशा प्रकारचे कोणकोणते सामाजिक उपक्रम करावे असे तुम्हांला वाटते? ते उपक्रम थोडक्यात सांगा.