Advertisements
Advertisements
प्रश्न
‘पर्यावरणाचे भान ठेवून होळी साजरी करा.’ याबाबत तुमचे मत दोन-तीन वाक्यांत लिहा.
उत्तर
खरे तर आपण 'होळी' सारखे सगळेच सण पर्यावरणाचे पूर्ण भान ठेवूनच साजरे केले पाहिजेत. 'होळी' हा सण 'चांगुलपणा वाढवा, वाईटपणा नष्ट करा (जाळा)' असा संदेश देतो. मग झाडांच्या फांद्या तोडून, पेटवून, निसर्गाची होळी करून हा सण साजरा करण्यापेक्षा आपण आपल्या विचारांत चांगले बदल घडवावेत. पर्यावरणाला नुकसान होईल, अशी वृक्षतोड करू नये आणि इतरांनाही करू देऊ नये.
संबंधित प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुटलेला वारा कसा होता?
खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा.
सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे.
घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात?
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
जिव्हाळा -
योग्य कारण शोधा.
चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात कारण ______.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
होळीच्या वेळी झोळी कशाने भरावी?
पाणपोई हा पाण्याशी संबंधित शब्द आहे. तसेच खालील शब्द वाचा व समजून घ्या.
पाराची वाडी या गावातील मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल तुमचे मत सांगा.
अशा प्रकारचे कोणकोणते सामाजिक उपक्रम करावे असे तुम्हांला वाटते? ते उपक्रम थोडक्यात सांगा.
‘पाणी’ या विषयावरची घोषवाक्ये तयार करून त्याच्या पाट्या तयार करा.