Advertisements
Advertisements
प्रश्न
‘पर्यावरणाचे भान ठेवून होळी साजरी करा.’ याबाबत तुमचे मत दोन-तीन वाक्यांत लिहा.
उत्तर
खरे तर आपण 'होळी' सारखे सगळेच सण पर्यावरणाचे पूर्ण भान ठेवूनच साजरे केले पाहिजेत. 'होळी' हा सण 'चांगुलपणा वाढवा, वाईटपणा नष्ट करा (जाळा)' असा संदेश देतो. मग झाडांच्या फांद्या तोडून, पेटवून, निसर्गाची होळी करून हा सण साजरा करण्यापेक्षा आपण आपल्या विचारांत चांगले बदल घडवावेत. पर्यावरणाला नुकसान होईल, अशी वृक्षतोड करू नये आणि इतरांनाही करू देऊ नये.
संबंधित प्रश्न
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
गोष्ट -
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही?
योग्य कारण शोधा.
चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात कारण ______.
कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी करा.
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
होळीला करायचा गोड पदार्थ -
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवीने काय तोडण्यास मनाई केली आहे?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
थकलेल्या वाटसरूला ग्लानी का येते?
चालून चालून थकलेल्या वाटसरूला थंडगार पाणी मिळाल्यावर त्याला काय वाटत असेल, कल्पना करा व लिहा.
पाराची वाडी या गावातील मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल तुमचे मत सांगा.
‘पाणी’ या विषयावरची घोषवाक्ये तयार करून त्याच्या पाट्या तयार करा.