Advertisements
Advertisements
प्रश्न
झोका व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
![]() |
![]() |
लेखन कौशल्य
उत्तर
झोका: | तुझ्या फांदीला बघ झुला मी बांधला. |
झाड: | पण माझी फांदी म्हणजेच आहे एक झुला. |
झोका: | खाली-वर, वर-खाली मी झोकात किती झुलतो! |
झाड: | अरे, पण माझ्यामुळेच तू इतका खुलतो! |
झोका: | मागे-पुढे आहे माझी ठेक्यावरती लय. |
झाड: | मी नसेन तर होईल तुझा लगेचच विलय. |
झोका: | तू तर आहेस एका जागी पूर्ण गाडलेला |
झाड: | मी घट्ट आहे मातीत म्हणूनच तुझा झोका वाढलेला. |
झोका: | तू एका जागी स्थिर, बघ मी किती गतिमान! |
झाड: | नको धरूस फुकटचा हा व्यर्थ अभिमान! |
झोका: | तू येतोस का झुल्यावर? येईल तुला मजा. |
झाड: | मी जर हललो जागेवरून तर तुलाच होईल सजा. |
झोका: | नको, नको रे झाडा! तू तर माझा मोठा भाऊ! |
झाड: | आरामात झोके घे तू, आपण दोघे सुखात राहू! |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?