हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

झोका व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

झोका व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

लेखन कौशल

उत्तर

झोका: तुझ्या फांदीला बघ झुला मी बांधला.
झाड: पण माझी फांदी म्हणजेच आहे एक झुला.
झोका: खाली-वर, वर-खाली मी झोकात किती झुलतो!
झाड: अरे, पण माझ्यामुळेच तू इतका खुलतो!
झोका: मागे-पुढे आहे माझी ठेक्यावरती लय.
झाड: मी नसेन तर होईल तुझा लगेचच विलय.
झोका: तू तर आहेस एका जागी पूर्ण गाडलेला
झाड: मी घट्ट आहे मातीत म्हणूनच तुझा झोका वाढलेला.
झोका: तू एका जागी स्थिर, बघ मी किती गतिमान!
झाड: नको धरूस फुकटचा हा व्यर्थ अभिमान!
झोका: तू येतोस का झुल्यावर? येईल तुला मजा.
झाड: मी जर हललो जागेवरून तर तुलाच होईल सजा.
झोका: नको, नको रे झाडा! तू तर माझा मोठा भाऊ!
झाड: आरामात झोके घे तू, आपण दोघे सुखात राहू!
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.1: असा रंगारी श्रावण (कविता) - चला संवाद लिहूया. [पृष्ठ २६]

APPEARS IN

बालभारती Integrated 8 Standard Part 2 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 1.1 असा रंगारी श्रावण (कविता)
चला संवाद लिहूया. | Q १. | पृष्ठ २६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×