Advertisements
Advertisements
प्रश्न
काळानुसार बाजाराचे प्रकार स्पष्ट करा.
स्पष्ट करा
उत्तर
- अत्यल्पकाळ: अत्यल्पकाळ म्हणजे असा काळ की ज्यामध्ये वस्तूंचा पुरवठा वाढवता येत नाही. त्यामुळे वस्तूंची किंमत मागणी निर्धारित करते. हा काळ काही दिवसांचा किंवा आठवड्याचा असतो. ज्यात वस्तूचा पुरवठा वाढविता येत नाही.
- अल्पकाळ: अल्पकाळ हा एका वर्षापेक्षा कमी कालावधीचा काळ आहे. या काळात वस्तू व सेवांचा पुरवठा काही प्रमाणात आदानांचे (उदा. श्रम) समायोजन करून वस्तूचा पुरवठा वाढविता येणे शक्य आहे.
- दीर्घकाळ: दीर्घकाळ हा असा कालावधी होय, ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणे शक्य असते. दीर्घकाळात उद्योगसंस्थांना सर्व प्रकारच्या खर्चाशी जुळवून घेणे शक्य होते. हा कालावधी काही वर्षांचा असतो. उदा. साधारणपणे ५ वर्षांपर्यंत.
- अतिदीर्घकाळ: अतिदीर्घकाळ म्हणजे असा काळ ज्यामध्ये उत्पादनाची सर्व आदाने (स्थिर आणि बदलते) बदलता येणे शक्य असते. हा कालावधी ५ वर्षांपेक्षा अधिक असतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?