Advertisements
Advertisements
प्रश्न
वरील परिच्छेद वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
कार्बनी संयुगांमध्ये अनेक मूलद्रव्यांचा समावेश असतो. बहुसंख्य कार्बनी संयुगामध्ये हायड्रोजन या मूलद्रव्याचा समावेश कमी अधिक प्रमाणात असतो. ज्या संयुगांमध्ये केवळ कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन म्हणतात. हायड्रोकार्बन ही सर्वांत साधी व मूलभूत कार्बनी संयुगे आहेत. सर्वात लहान हायड्रोकार्बन म्हणजे एक कार्बन अणू व चार हायड्रोजन अणू यांच्या संयोगाने झालेला मिथेन \[\ce{CH4}\]. आपण मिथेनची संरचना आधीच पाहिली आहे. ईथेन हा आणखी एक हायड्रोकार्बन असून त्याचे रेणुसूत्र \[\ce{C2H6}\] आहे. ज्या कार्बनी संयुगांतील दोन कार्बन अणूंमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंब असतो त्यांना असंपृक्त संयुग म्हणतात. एथीनव ईथाइन हे असंपृक्त हायड्रोकार्बन आहेत. कार्बन-कार्बन दुहेरी बंध असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बनांना 'अल्कीन' म्हणतात. ज्यांच्या संरचनेमध्ये कार्बन-कार्बन तिहेरी बंध असतो अशा असंपृक्त हायड्रोकार्बनांना 'अल्काइन'असे म्हणतात. साधारणपणे असंपृक्त संयुगे ही संपृक्त संयुगांपेक्षा जास्त अभिक्रियाशील असतात. |
- हायड्रोकार्बन म्हणजे काय?
- सर्वात लहान हायड्रोकार्बनचे नाव लिहा.
- असंपृक्त संयुगाची व्याख्या लिहा.
- फरक स्पष्ट करा - अल्कीन आणि अल्काइन.
आकलन
उत्तर
- ज्या संयुगांमध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात, त्यांना हायड्रोकार्बन म्हणतात. हायड्रोकार्बन ही सर्वात सोपी आणि मूलभूत कार्बनी संयुगे मानली जातात.
- मिथेन हे सर्वात लहान हायड्रोकार्बन आहे.
- ज्या कार्बनी संयुगांमध्ये दोन कार्बन अणूंमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो, त्यांना असंपृक्त संयुगे म्हणतात. एथीन आणि ईथाइन ही असंपृक्त हायड्रोकार्बनची उदाहरणे आहेत.
अल्कीन अल्काइन i. अल्कीनमध्ये कार्बन-कार्बन दुहेरी बंध असतात. अल्काइन कार्बन-कार्बन तिहेरी बंध असतात ii. अल्कीन \[\ce{C_nH_{2n}}\] या सामान्य सूत्राने दर्शवता येतात. अल्काइन \[\ce{C_nH2_{n-2}}\] या सामान्य सूत्राने दर्शवता येतात. iii अल्कीनमधील पहिला सदस्य एथिलीन \[\ce{(CH2=CH2)}\] आहे. अल्काइन मधील पहिला सदस्य अँसिटिलीन \[\ce{CH ≡ CH}\] आहे. iv. उदा. एथीन, प्रोपीन इ. उदा. ईथाइन, प्रोपाहइन इ.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?