Advertisements
Advertisements
प्रश्न
कारणे लिहा.
शिवरायांनी पुरंदरचा तह केला.
कारण सांगा
उत्तर
- शिवाजी महाराजांच्या वाढत्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी औरंगजेबाने मिर्झाराजा जयसिंगला पुण्याला पाठवले.
- शिवाजी महाराजांच्या ताब्यातील किल्ले ताब्यात घेण्यासाठी जयसिंगने स्वराज्याच्या विविध भागात मुघल सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या. या सैन्याने स्वराज्याच्या प्रदेशांचे मोठे नुकसान केले.
- शिवाजी महाराजांनी मुघलांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तथापि, जयसिंग आणि दिलेरखान यांनी पुरंदरच्या किल्ल्याला वेढा घातला.
- मुरारबाजी देशपांडे यांनी पुरंदर येथे मुघलांचा प्रतिकार करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना वीरमरण आला.
- परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराजांनी जयसिंगाशी बोलणी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जयसिंगाची भेट घेतली, जयसिंग व महाराज यांच्यात जून १६६५ मध्ये तह झाला. हा तह 'पुरंदरचा तह' म्हणून ओळखला जातो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?