Advertisements
Advertisements
प्रश्न
कॅनडामध्ये लाकूडतोडीच्या व्यवसायाचा विकास झाला आहे.
उत्तर
कॅनडामध्ये प्रामुख्याने समशीतोष्ण सूचिपर्णी वृक्षांची वने आढळतात. सूचिपर्णी वनांच्या क्षेत्रात मऊ लाकडांची वृक्षे असतात. त्यामुळे लाकूडतोड करणे सोपे जाते. या वनात एकाच जातीचे वृक्ष एकत्रित वाढतात. त्यामुळे वृक्ष तोडणे व त्यांचे वर्गीकरण करणे अतिशय सुलभ होते. सूचिपर्णी वने ही मोकळ्या स्वरूपाची वने असल्यामुळे तेथे लाकूडतोड करणे सोयीचे असते. सूचिपर्णी वने वाहतूकदृष्ट्या सुगम असतात. या वनात मऊ लाकडाची वृक्षे असल्याने त्यांचे लाकूड हलके असते. ज्यामुळे त्यांची वाहतूक करणे सोपे जाते. शिवाय या प्रदेशात इतर प्राथमिक व्यवसायांची उपलब्धता कमी आहे. हिवाळे तीव्र असल्यामुळे शेती किंवा पशुपालन असे व्यवसाय करण्यास येथे मर्यादा पडतात. याशिवाय हिवाळ्यात गोठलेल्या नद्यांच्या पात्रांवर म्हणजेच हिम नद्यांवर लाकूडतोड करून लाकडाचे ओंडके रचले जातात. उन्हाळ्यात बर्फ वितळू लागले की नद्यांच्या प्रवाहाबरोबर हे ओंडके वाहत जाऊन लाकूड कापण्याच्या कारखान्यांपर्यंत सहज पोहोचतात. अशाप्रकारे कॅनडामध्ये लाकूडतोडीचा व्यवसाय विकसित झाला आहे.