Advertisements
Advertisements
प्रश्न
उष्ण कटिबंधीय प्रदेशांपेक्षा समशीतोष्ण कटिबंधात लाकूडतोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात का चालत असावा?
टीपा लिहा
उत्तर
(१) समशीतोष्ण वनातील झाडांची संख्या ही तुलनेने कमी असते आणि ही वने विरळ आहेत.
(२) या वनातील झाडे सरळ आणि उंच वाढतात.
(३) या वनातील झाडांचे लाकूड हे मऊ असते.
(४) या लाकडाचा उपयोग फर्निचर निर्मिती आणि कागदाचा लगदा निर्मिती उद्योगात होतो.
(५) त्यामुळे या वनांमधील लाकडाला खूप मागणी आहे.
(६) वनातील झाडांची घनता कमी असल्यामुळे येथील वाहतूक सुगमता जास्त आहे.
(७) या प्रदेशात हवामान आल्हाददायक असते.
(८) त्यामुळे समशीतोष्ण कटिबंधीय वनात व्यापारी तत्त्वावर आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि यंत्रसामग्रीचा वापर करून लाकूडतोड केली जाते.
shaalaa.com
प्राथमिक व्यवसाय - लाकूडतोड
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?