Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उतरे द्या.
धातुंची विशिष्ट उष्माधारकता
- कोणत्या मूलद्रव्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वांधिक आहे? स्पष्ट करा.
- कोणत्या मूलद्रव्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वात कमी आहे? स्पष्ट करा.
- पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय?
उत्तर
- लोखंडाची विशिष्ट उष्माधारकता जास्त आहे. कारण लोखंडी गोळ्याने पाण्याकडून अधिक उष्णता शोषून घेतली आहे.
- शीसे या मुलद्रव्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वात कमी आहे. कारण शिस्याने पाण्याकडून सर्वात कमी उष्णता शोषून घेतली आहे.
- एकक वस्तुमानाच्या पदार्थांचे तापमान 1°C ने वाढविण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
समान वस्तुमान असलेल्या वेगवेगळ्या पदार्थांस समान उष्णता दिली असता त्यांचे वाढणारे तापमान त्यांच्या ______ गुणधर्मामुळे समान नसते.
पदार्थाचे द्रवातून स्थायूत रुपांतर होत असताना पदार्थातील अप्रकट उष्मा ______.
खालील उताऱ्याचे वाचन करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
उष्ण व थंड वस्तूंमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते. जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही तोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो. या क्रियेत गरम वस्तू उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात अशा स्थितीत असल्यास म्हणजेच जर दोनही वस्तूंची प्रणाली (System) वातावरणापासून वेगळी केल्यास प्रणाली मधून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही अशा स्थितीत आपणांस खालील तत्त्व मिळते.
उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. या तत्वास उष्णता विनिमयाचे तत्त्व म्हणतात.
अ. उष्णता स्थानांतरण कोठून कोठे होते?
आ. अशा स्थितीत आपणास उष्णतेच्या कोणत्या तत्वाचा बोध होतो?
इ. ते तत्व थोडक्यात कसे सांगता येईल?
ई. या तत्वाचा उपयोग पदार्थाच्या कोणत्या गुणधर्माच्या मापनासाठी केला जातो?
1 g वस्तुमानाचे दोन पदार्थ अ आणि ब यांना एकसारखी उष्णता दिल्यावर अ चे तापमान 3°C ने तर ब चे तापमान 5°C ने वाढवले यावरून अ व ब पैकी कोणाची विशिष्ट उष्माधारकता जास्त आहे? किती पटीने?
खालीलपैकी ______ या धातूची विशिष्ट उष्माधारकता सर्वांत जास्त आहे.
विशिष्ट उष्माधारकतेचे SI मापन पद्धतीतील एकक _____ आहे.
नावे लिहा.
ज्या स्थिर तापमानावर एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचे वायमध्ये पूर्ण रूपांतर होत असताना द्रवात शोषलेली उष्णता.
पाण्याची विशिष्ट उष्माधारकता 1 cal/g°C आहे.
सर्व धातूंची विशिष्ट उष्माधारकता सारखीच असते.
खालील उताऱ्याचे वाचन करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
उष्ण व थंड वस्तूंमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते. जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही तोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो. या क्रियेत गरम वस्तू उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात अशा स्थितीत असल्यास म्हणजेच जर दोनही वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास प्रणालीमधून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही. |
अ. उष्णतेचे स्थानांतरण कोठून कोठे होते?
ब. अशा स्थितीत आपल्याला उष्णतेच्या कोणत्या तत्त्वाचा बोध होतो?
क. ते तत्त्व थोडक्यात कसे सांगता येईल?