मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा. वृत्तेतिहास पद्धत - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.

वृत्तेतिहास पद्धत

थोडक्यात उत्तर

उत्तर

वृत्‍तेतिहास पद्धत ही प्रामुख्याने चिकित्‍सा मानसशास्‍त्रज्ञांद्‌वारे वापरण्यात येणारी एक महत्‍त्‍वाची वर्णनात्‍मक संशोधन पद्धत आहे. डॉ. सिग्‍मंड फ्रॉईड आणि जीन पियाजे यांनी वृत्‍तेतिहास पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. एखाद्या व्यक्‍तीची, समुहाची किंवा घटनेची सर्वंकष माहिती देणारी पद्धत म्‍हणजे वृत्‍तेतिहास पद्धत होय.

या पद्धतीतील उपयुक्‍त वर्णनात्‍मक माहिती पुढील संशोधनांना अभ्‍युपगम पुरवते, त्‍यामुळे या पध्दतीकडे शास्‍त्रीय पद्धत म्‍हणून पाहता येते. वृत्‍तेतिहास पद्धतीत संशोधक एखाद्या व्यक्‍तीच्या सद्यस्‍थितीतील मानसिक स्‍थितीचा अभ्‍यास करण्यासाठी कुटुंबातील सदस्‍य, मित्रपरिवार, सहकारी इत्‍यादी अनेक स्रोतांकडून संबंधित व्यक्‍तीची सखोल माहिती मिळवतो. संशोधक प्रत्‍यक्ष निरीक्षण, मुलाखत, मानसशास्‍त्रीय चाचण्या इत्‍यादी तंत्रांचा वापर करून संबंधित व्यक्‍तीची माहिती मिळवतो.

shaalaa.com
मानसशास्‍त्राच्या अभ्‍यासपद्धती
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×