मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

खालील माहिती वाचून त्याआधारे तक्ता पूर्ण करा. क्रियापदांचे काळ क्रियापद क्रियेचा बोध होतो. क्रिया कोणत्या वेळी घडली याचा बोध होतो. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील माहिती वाचून त्याआधारे तक्ता पूर्ण करा.

क्रियापदांचे काळ

क्रियापद 

  1. क्रियेचा बोध होतो.
  2. क्रिया कोणत्या वेळी घडली याचा बोध होतो.

लक्षात ठेवा: क्रियापदावरून क्रिया घडण्याच्या वेळेचा जो बोध होतो त्याला ‘काळ’ असे म्हणतात.

काळ वैशिष्ट्य वाक्य
वर्तमानकाळ क्रियापदाच्या रूपावरून क्रिया घडते आहे असे समजते. मी अभ्यास करतो.
भूतकाळ क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेली आहे असे समजते. मी अभ्यास केला.
भविष्यकाळ क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडणार आहे असे समजते. मी अभ्यास करीन.

 

क्रियापद वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ
खेळणे खेळतो खेळलो खेळेन
बघणे ______ बघितले ______
करणे ______ केले ______
खाणे खातो ______ खाईन
वाचणे वाचतो ______ ______
तक्ता

उत्तर

क्रियापद वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ
खेळणे खेळतो खेळलो खेळेन
बघणे बघतो बघितले बघेन
करणे करतो केले करेन
खाणे खातो खाल्ले खाईन
वाचणे वाचतो वाचले वाचीन
shaalaa.com
शब्दांच्या जाती - क्रियापद
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 12: मोर - कृती [पृष्ठ ३६]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) - Antarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 12 मोर
कृती | Q (९) | पृष्ठ ३६

संबंधित प्रश्‍न

खालील शब्दांच्या जाती ओळखून लिहा.

करणे-  


खालील वाक्यातील क्रियापद ओळखा.

सायरा आज खूप खूश होती.


खालील वाक्यातील क्रियापद ओळखा.

अनुजाने सुटकेचा नि:श्वास टाकला.


खालील वाक्यातील क्रियापद ओळखा.

मित्राने दिलेले गोष्टींचे पुस्तक अब्दुलला खूप आवडले.


खालील वाक्यातील क्रियापद ओळखा.

जॉनला नवीन कल्पना सुचली.


खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा व अधोरेखित करा.

तो बघ मोर, किती सुंदर !


खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा व अधोरेखित करा.

मुलांनी टाळ्या वाजवल्या.


खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा व अधोरेखित करा.

वैष्णवी सुंदर चित्र काढते.


खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा व अधोरेखित करा.

शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×