Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मध्ये फरक स्पष्ट करा:
आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण
फरक स्पष्ट करा
उत्तर
अ. क्र. | आधुनिकीकरण | जागतिकीकरण |
1. | आधुनिक विज्ञानाचे मानवी व्यवहारातील उपयोजन म्हणजे आधुनिकीकरण. | वेगवेगळ्या देशांतील अर्थव्यवस्था, संस्कृती, आणि तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीमुळे जग एकमेकांशी जोडले जाते. |
2. | विज्ञाननिष्ठता म्हणजे कोणत्याही गोष्टीचे आकलन आणि स्पष्टीकरण करण्याची वैज्ञानिक पद्धती होय. | जागतिकीकरणामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारपेठेचा विस्तार झाला आहे. |
3. | आधुनिकीकरणामुळे मूल्यपद्धती, श्रदधाप्रणाली आणि वर्तणुकीसंबंधीचे संकेत यांमध्ये बदल घडून आला आहे. | जागतिकीकरणामुळे ज्ञान, तांत्रिक कौशल्य, मनुष्यबळ आणि अन्य संसाधनांची देवाणघेवाण विविध राष्ट्रांमध्ये होत आहे. |
4. | समस्यांच्या निराकरणासाठी नवीन कल्पनांचे स्वागत करणे, उपलब्ध पर्यायांची पडताळणी करणे, नवीन मार्ग चोखाळणे, नवनिर्मितीच्या मार्गांचा शोध घेणे अशा गोष्टी स्वेच्छेने स्वीकारणे आवश्यक असते. | जागतिकीकरण संसाधनांच्या वाटणीवर आधारित आहे. 'बाह्यस्रोतांचा वापर' या संकल्पनेशी आपण परिचित आहोत. त्यामुळे लोक भौगोलिक सीमा ओलांडून कार्य करतात. |
5. | आधुनिकीकरण असल्याचा दावा करणारे लोक दैनंदिन घटना, साहित्य, कला, संस्कृती, परंपरा आणि श्रद्धा यांचे चिकित्सक दृष्टीकोनातून परीक्षण करतात. | जागतिकीकरणामुळे सर्व लोक आणि राष्ट्रे एकमेकांवर अवलंबून राहिली आहेत. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?