Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील ओळीतील भाव स्पष्ट करा.
'गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब.
लघु उत्तर
उत्तर
गोधडी अंगावर पांघरल्यावर जी ऊब मिळते ती केवळ कपड्यांची नसते. त्यात आईच्या लुगड्यांची पटकुरे, बाबांच्या कोपरीच्या बाह्या असतात. आईच्या फाटक्या लुगड्याचे व बाबांच्या फाटक्या धोतराचे अस्तर गोधडीला खालीवर जोडलेले आहे. जणू आईवडिलांची माया सतत त्या गोधडीतून जाणवते. म्हणून कवी म्हणतात, गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचा बोचका नसून त्यात साक्षात मायेची ऊब साठवलेली आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?