Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील ओळीतील भाव स्पष्ट करा.
'गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते.'
लघु उत्तर
उत्तर
गोधडी' हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. गरिबीमध्ये हलाखीचा संसार करताना आईवडिलांनी खूप कष्ट सोसले. त्याच्या प्रेमळ खुणा गोधडीत दिसत आहेत. अस्तर म्हणजे गोधडी फाटू नये म्हणून आतून जोडलेले वस्त्र होय. कष्टमय जीवनाला मायेने सांभाळण्याचे अस्तर माझ्या आई-वडिलांचे आहे, असे कवींना सुचवायचे आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?