मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. तद्नुभूती वाढविण्याचे कोणतेही दोन उपाय स्पष्ट करा. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. 

तद्नुभूती वाढविण्याचे कोणतेही दोन उपाय स्पष्ट करा.

थोडक्यात उत्तर

उत्तर

  1. आंतरक्रिया वाढवणे: ज्या व्यक्‍तींना मदतीची गरज आहे. त्या व्यक्तींबरोबर आंतरक्रिया वाढवणे व साधा सोपा उपाय उपयोगी पडू शकतो. अशा सततच्या संपर्कामुळे, सहवासामुळे ज्यांना मदत केली जात आहे. त्यांचा दृष्टिकोन आणि प्रेरणा समजणे शक्‍य होते.
  2. सारखेपणा लक्षात येणे: आपण व दुसऱ्या व्यक्ती यामध्ये असलेला सारखेपणा लक्षात आणून देण्याने तद्नुभूती वाढवण्याकरिता उपयोग होऊ शकतो. उदा. समान स्वरूपाची कामे करण्याचा अनुभव, एकसारख्या प्रकारच्या समस्या असणे, देशाच्या एकाच भागाचे रहिवासी असणे इ. यातून आपण एकाच जगाचे' भाग आहोत, असा विचार निर्माण व्हायला मदत होते. उदा. अनेक वर्षापासून अमेरिकेत राहणारे भारतीय हे नव्याने अमेरिकेत येणाऱ्या भारतीयांना मदत करतात.
  3. स्वतःच्या भावनांचे परीक्षण करणे: दुसऱ्याला समजावून घेण्यासाठी स्वत:ला समजून घेणे ही पहिली पायरी आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की स्वत:च्या प्रेरणा व भावना याचे ज्यांना अचूक ज्ञान आहे त्या व्यक्‍ती तद्नुभूती अधिक प्रमाणात दर्शवतात.
  4. स्वतःला आव्हान देणे: जेव्हा तुम्हाला एखादी अतिशय आव्हान देणारी आणि परिश्रम करून ध्येय गाठायची वेळ येते तेव्हा तुम्ही अधिक विनयशील व नम्र बनता, जी तुम्हाला तद्नुभूतीकडे नेणारी गोष्ट असते.
  5. कुतूहल प्रेरणा वाढविणे: परीक्षण करण्याच्या सवयीच्या जागी कुतूहलाने पाहण्याची सवय करून पहा. कुतूहलामुळे अधिक प्रश्‍न विचारण्याची प्रवृत्ती निर्माण होते. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांबाबत तुम्ही अधिक मोकळेपणाने आणि अधिक समजुतीने पाहण्याची सवय लागते.
  6. दृष्टी विस्तारित करा: तद्नुभूती, विशेष करून अनोळखी व्यक्तींबाबत, आपल्यापेक्षा वेगळ्या व्यक्तींच्या संपर्कातून सुरू होतो. संशोधनातून असे आढळून आले आहे की, वेगवेगळ्या वंशाच्या लोकांशी संपर्क वाढल्याने त्यांच्या बाबतची तद्नुभूती चेतापेशीय पातळीपर्यंत वाढीस लागलेली आहे.
shaalaa.com

Notes

Student can refer to the provided solution based on their prefer marks.

तद्नुभूती कशी वाढवावी?
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×