Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दांना एकत्र गुंफून सुंदर कथा तयार करा.
मैत्री → | दप्तर → | गृहपाठ → | रस्ता |
उत्तर
अनोखी मैत्री
विजय आणि अजय खूप चांगले मित्र होते. ते रोज एकत्र शाळेत जात, एकत्र अभ्यास करत, एकत्र खेळत. एकमेकांशिवाय त्यांचे पानही हलत नसे.
एकदा काय झाले, विजयची गृहपाठाची वही चुकून हरवली. विजय प्रचंड घाबरला कारण दुसऱ्या दिवशी वर्गशिक्षिका सर्व विद्यार्थ्यांच्या गृहपाठाच्या वह्या तपासणार होत्या. अजयलाही फार वाईट वाटले. दोघांनी आपापली दप्तरे पुन्हापुन्हा तपासली; पण वही मिळालीच नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी जड पावलांनी दोघे शाळेत पोहोचले. पहिल्याच तासाला वर्गशिक्षिकांनी गृहपाठ वह्या बाकावर काढून ठेवायला सांगितल्या. वर्गशिक्षिका प्रत्येक बाकावरील वही तपासत होत्या. त्या विजयच्या बाकाजवळ जाण्याआधीच अजयने आपली वही विजयच्या बाकावर ठेवली. विजयची सुटका झाली. अजयला मात्र पन्नास उठाबशा आणि हातावर दोन छड्या मिळणार हे पाहून विजय रडवेला झाला. त्याने वर्गशिक्षिकांना सर्व सत्य सांगितले. अजयचे विजयवरचे प्रेम पाहून त्याही क्षणभर अवाक् झाल्या. अजयने विजयसाठी केलेला त्याग विजयच्या प्रामाणिकपणाइतका खरा होता. त्यांनी या दोन्ही लेकरांना पोटाशी धरले.
आज संध्यावळी घरी परतताना तो वळणावळणाचा रस्ता विजय-अजयच्या खुललेल्या चेहऱ्याकडे पाहून खुद्कन हसला. घर जवळ येताच विजय अजयला ओढत ओढत घरी घेऊन गेला ते आईला आजची अनोखी गोष्ट सांगण्यासाठी! पाहतो तर काय, आई वही घेऊन चक्क दारात उभी! ’गडबडीत कपाटाच्या खाली सारून गेलास वही! विजय, किती हा वेंधळेपणा!“ दोघा मित्रांनी एकमेकांकडे पाहिले. ते खुद्कन हसले. मग मात्र आईला आपल्या जिवलग मित्राच्या अनोख्या मैत्रीची गोष्ट सांगण्यासाठी विजय पुढे सरसावला.
तात्पर्य: जो संकटात साथ देतो तोच खरा मित्र.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा.
आंतरशालेय क्रीडास्पर्धा – धावण्याची स्पर्धा – शाळेतर्फे वरदचा सहभाग – वरद उत्तम धावपटू – सराव – उत्तम धावपटू तनयशी स्पर्धा – प्रत्यक्ष स्पर्धा – चुरशीची स्पर्धा – अचानक तनयचा पाय मुरगळणे – स्पर्धा सोडून वरदचे मदतीला धावणे – स्पर्धा हरूनही वरदचे कौतुक –
खालील कथालेखन करा.
महेंद्र नावाचा विद्यार्थी ______ हलाखीची परिस्थिती ______ रानात रोपट्यांचा शेंडा तुटलेला पाहाणे ______ मनात विचार ______ आत्मज्योत जागृत होणे ______ प्रयत्नांची पराकाष्ठा ______ यशस्विता ______ लेखक म्हणून प्रसिद्धी.
खालील कथालेखन करा.
रतन नावाचा तरुण ______ साधारण जीवनशैली ______ अडगळीतील वस्तू _____ कल्पनाशक्तीचा वापर ______ जोडणी ______ शेतीसाठी उपयुक्त यंत्रनिर्मिती ______ उपयोग ______ राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त.
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
एकीचे बळ
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
प्रामाणिकपणाचे फळ
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
पर्यावरणाचे रक्षण काळाची गरज
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.
मुद्दे: अनाथ मुलगा – रोज सकाळी वर्तमानपत्राचे वाटप – दुपारी शाळेत – रस्त्यात एक पाकीट मिळते – वर्गशिक्षकांकडे देणे – पाकिटावरील पत्यावरून योग्य व्यक्तिपर्यंत पोहोचवणे – मालकाला आनंद – शाबासकी – मुलाला बक्षीस व त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे.
खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचाराने व कल्पनेने कथा पूर्ण करा.
आज शाळेमध्येखो खोच्या संघाचे आंतरशालेय सामने सुरू होणार होते. सकाळी ७ वाजताच शाळेचा सर्व संघ मैदानावर हजर होता. सर्वांच्याच मनात उत्सुकता, उत्साह, चैतन्य संचारले होते. सलीम आमच्या संघाचा कर्णधार मात्र अजून यायचा होता. आम्ही सर्वजण त्याची आतुरतेने वाट पाहत होतो. सलीम अजून का येत नाही म्हणून चिंतीतही होतो. पंचांनी दोन्ही संघांना मैदानात पाचारण केले. संघात कुजबुज सुरू झाली आणि तेवढ्यात धापा टाकत सलीम मैदानावर आला आणि... |
तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या व कथेचे तात्पर्य लिहा.
खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.
प्रकाश आणि अन्वर जीवश्चकंठश्च मित्र. एकाच वर्गात, एकाच बाकावर बसणारे, एकत्र डबा खाणारे सच्चे सोबती. दिवाळीची सुट्टी लागली आणि अन्वर आईबरोबर गावाला गेला. आता सुट्टी संपेपर्यंत हे मित्र भेटणार नव्हते. दिवाळीची सुट्टी संपायला दोन दिवस होते. प्रकाशला अन्वरच्या भेटीची ओढ लागली होती. सुट्टीतला अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रकाशने दप्तर काढले. पुस्तकात त्याला अन्वरने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. त्याने उत्सुकतेने चिठ्ठी वाचायला घेतली आणि..... |
- तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या.
- कथा तयार करताना व लिहिताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या? ते लिहा.
पुढील मुद्दयांवरुन कथालेखन करा.
मुद्दे - एक राजा - त्याची प्रजा आळशी होती - त्यांना उद्योगी बनवण्यासाठी राजा युक्ती करतो - रस्त्यात मधोमध दगड ठेवतो - त्यांच्याखाली - सोन्याची नाणी असलेली पिशवी - अनेक लोक जातात, पण दगड उचलत नाहीत - एक गरीब माणूस तो उचलतो - पिशवीतील नाणी त्याला मिळतात - लोकांना हे कळते - लोक उद्योगी बनतात -