English

खालील शब्दांना एकत्र गुंफून सुंदर कथा तयार करा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

खालील शब्दांना एकत्र गुंफून सुंदर कथा तयार करा.

मैत्री  → दप्तर  → गृहपाठ  → रस्ता
Answer in Brief

Solution

अनोखी मैत्री

विजय आणि अजय खूप चांगले मित्र होते. ते रोज एकत्र शाळेत जात, एकत्र अभ्यास करत, एकत्र खेळत. एकमेकांशिवाय त्यांचे पानही हलत नसे.

एकदा काय झाले, विजयची गृहपाठाची वही चुकून हरवली. विजय प्रचंड घाबरला कारण दुसऱ्या दिवशी वर्गशिक्षिका सर्व विद्यार्थ्यांच्या गृहपाठाच्या वह्या तपासणार होत्या. अजयलाही फार वाईट वाटले. दोघांनी आपापली दप्तरे पुन्हापुन्हा तपासली; पण वही मिळालीच नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी जड पावलांनी दोघे शाळेत पोहोचले. पहिल्याच तासाला वर्गशिक्षिकांनी गृहपाठ वह्या बाकावर काढून ठेवायला सांगितल्या. वर्गशिक्षिका प्रत्येक बाकावरील वही तपासत होत्या. त्या विजयच्या बाकाजवळ जाण्याआधीच अजयने आपली वही विजयच्या बाकावर ठेवली. विजयची सुटका झाली. अजयला मात्र पन्नास उठाबशा आणि हातावर दोन छड्या मिळणार हे पाहून विजय रडवेला झाला. त्याने वर्गशिक्षिकांना सर्व सत्य सांगितले. अजयचे विजयवरचे प्रेम पाहून त्याही क्षणभर अवाक् झाल्या. अजयने विजयसाठी केलेला त्याग विजयच्या प्रामाणिकपणाइतका खरा होता. त्यांनी या दोन्ही लेकरांना पोटाशी धरले.

आज संध्यावळी घरी परतताना तो वळणावळणाचा रस्ता विजय-अजयच्या खुललेल्या चेहऱ्याकडे पाहून खुद्कन हसला. घर जवळ येताच विजय अजयला ओढत ओढत घरी घेऊन गेला ते आईला आजची अनोखी गोष्ट सांगण्यासाठी! पाहतो तर काय, आई वही घेऊन चक्क दारात उभी! ’गडबडीत कपाटाच्या खाली सारून गेलास वही! विजय, किती हा वेंधळेपणा!“ दोघा मित्रांनी एकमेकांकडे पाहिले. ते खुद्कन हसले. मग मात्र आईला आपल्या जिवलग मित्राच्या अनोख्या मैत्रीची गोष्ट सांगण्यासाठी विजय पुढे सरसावला.

तात्पर्य: जो संकटात साथ देतो तोच खरा मित्र.

shaalaa.com
कथालेखन
  Is there an error in this question or solution?
Chapter 16.3: उपयोजित लेखन - कथालेखन [Page 77]

APPEARS IN

Balbharati Marathi - Aksharbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 16.3 उपयोजित लेखन
कथालेखन | Q २ | Page 77

RELATED QUESTIONS

खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

लक्ष्मण नावाचा तरुण----कैदेत----गावप्रमुखाचे कैदखान्याचे निरीक्षण करणे----लक्ष्मणची सुटकेसाठीची विनंती----सुटका व आर्थिक मदत----लक्ष्मण पक्षी घेऊन बाजारात----सर्व पक्षी पिंजऱ्यासहित विकत घेणे----पक्षी विक्रेत्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह----पक्ष्यांची पिंजऱ्यातून मुक्तता----मुक्ततेचा आनंद----बोध.


खालील कथालेखन करा.

रतन नावाचा तरुण ______ साधारण जीवनशैली ______ अडगळीतील वस्तू _____ कल्पनाशक्तीचा वापर ______ जोडणी ______ शेतीसाठी उपयुक्त यंत्रनिर्मिती ______ उपयोग ______ राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त.


खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.

एका गावात रामकृष्ण आणि शेवंता नावाचं सामान्य परिस्थितीतील कुटुंब राहत होतं. त्यांना राकेश व प्रांजल नावाची दोन अपत्ये हाती. राकेश आणि प्रांजल दोघेही हुशार आणि आज्ञाधारक होती. अचानक सहा वर्षांची असतानाच प्रांजलची दृष्टी गेली. आईवडिलांना धक्का बसला; पण ते डगमगले नाहीत. त्यांनी तिचा शिक्षणाकडे असलेला ओढा, तिची जिद्द आणि चिकाटी पाहून तिला अंध मुलांच्या शाळेत घातले. तिची अभ्यासातील हुशारी, शिकण्याचा वेग, चिकाटी आणि मेहनत घेण्याची अभिलाषा पाहून शिक्षकांनीही तिची सर्वतोपरी मदत केली आणि पुढे ती...


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे


खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा:

एक गरीब मुलगा – शाळेची फी भरण्यास पैसे नसणे – सकाळी पेपर टाकण्याचे काम – वाटेत पैशाचे पाकीट मिळणे – प्रामाणिकपणे पोलिस स्टेशनवर नेऊन देणे – पाकिटाच्या मालकास आनंद – बक्षीस.


खालील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट पूर्ण करा.

हट्टी राजकन्या त्याला अर्धे राज्य मिळते
`↓` `↑`
राज्यकन्येची अट शेतकऱ्याचा मुलगा येतो
`↓` `↑`
न संपणारी गोष्ट सांगणे बरेच जण प्रयत्न करतात
`↓` `↑`
राज्यात दवंडी अर्धे राज्य

खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचाराने व कल्पनेने कथा पूर्ण करा.

आज शाळेमध्येखो खोच्या संघाचे आंतरशालेय सामने सुरू होणार होते. सकाळी ७ वाजताच शाळेचा सर्व संघ मैदानावर हजर होता. सर्वांच्याच मनात उत्सुकता, उत्साह, चैतन्य संचारले होते. सलीम आमच्या संघाचा कर्णधार मात्र अजून यायचा होता. आम्ही सर्वजण त्याची आतुरतेने वाट पाहत होतो. सलीम अजून का येत नाही म्हणून चिंतीतही होतो. पंचांनी दोन्ही संघांना मैदानात पाचारण केले. संघात कुजबुज सुरू झाली आणि तेवढ्यात धापा टाकत सलीम मैदानावर आला आणि...

तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या व कथेचे तात्पर्य लिहा.


खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.

प्रकाश आणि अन्वर जीवश्चकंठश्च मित्र. एकाच वर्गात, एकाच बाकावर बसणारे, एकत्र डबा खाणारे सच्चे सोबती. दिवाळीची सुट्टी लागली आणि अन्वर आईबरोबर गावाला गेला. आता सुट्टी संपेपर्यंत हे मित्र भेटणार नव्हते. दिवाळीची सुट्टी संपायला दोन दिवस होते. प्रकाशला अन्वरच्या भेटीची ओढ लागली होती. सुट्टीतला अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रकाशने दप्तर काढले. पुस्तकात त्याला अन्वरने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. त्याने उत्सुकतेने चिठ्ठी वाचायला घेतली आणि.....
  • तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या.
  • कथा तयार करताना व लिहिताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या? ते लिहा.

पुढील मुद्दयांवरुन कथालेखन करा.

मुद्दे - एक राजा - त्याची प्रजा आळशी होती - त्यांना उद्योगी बनवण्यासाठी राजा युक्ती करतो - रस्त्यात मधोमध दगड ठेवतो - त्यांच्याखाली - सोन्याची नाणी असलेली पिशवी - अनेक लोक जातात, पण दगड उचलत नाहीत - एक गरीब माणूस तो उचलतो - पिशवीतील नाणी त्याला मिळतात - लोकांना हे कळते - लोक उद्योगी बनतात -


खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.

एक कोल्हा - भूक लागते - द्राक्षांची बाग - खाण्याची इच्छा - द्राक्षांचा वेल उंच - उड्या मारतो - थकतो - आंबट द्राक्षे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×