Advertisements
Advertisements
Question
खालील अपूर्ण कथा पूर्ण करा.
दिवस कधी मावळला ते कळलेच नाही त्या दिवशी! पाहुण्यांनी घर भरून गेलं होतं. आजीच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण होत होती. सर्वजण या निमित्ताने एकत्र आलेले पाहून आजी तृप्त झाली होती. एकमेकांशी रक्ताने व मनाने जोडलेल्या तीन पिढ्या एकत्र जमल्या होत्या. दिवसभराच्या कार्यक्रमानंतर संध्याकाळी हास्यविनोदात, मनमोकळ्या गप्पांत सारेजण दंग होते आणि अगदी अचानक या गप्पांत एक अनोळखी आवाज ऐकू आला. ‘जिजी...मी आलो ग!’ खूप वर्षांनी आजीने हा आवाज ऐकला आणि .... |
Solution
अपूर्व भेट
...आजीने आवाजाच्या दिशेने पाहिले, तर एक गोरापान, तेजस्वी तरुण तिच्याजवळ आला. त्याने तिला वाकून नमस्कार केला. ’जिजी, ओळखलंस मला?“ आजीने त्याला क्षणभर न्याहाळले आणि म्हणाली, ’तुला रे कोण विसरणार विजू!“ तिच्या चेहऱ्यावर आश्चर्यमिश्रित सुखद भाव तरळत होते. दोघांच्याही डोळ्यांत आनंदाश्रूंनी गर्दी केली होती.
हा विजू म्हणजे खूप वर्षांपूर्वी आजीच्या घराशेजारीच राहणाऱ्या वसुधाकाकूंचा मुलगा. त्याच्या लहानपणीच वसुधाकाकूंचे निधन झाले. त्याचे वडील कामानिमित्त बाहेर असायचे. संपूर्ण दिवस हा लहानगा विजू आजीच्या घरीच असायचा. आजीने अगदी त्याचा मुलासारखा सांभाळ केला. रोज सकाळी त्याचे वडील कामावर गेले, की हा आजीजवळ यायचा. मग याचा अभ्यास, नाश्ता करून घेणे, तो वेळेवर शाळेत जाण्यासाठी डबा, पाणी भरून देणे ही कामे आजी अगदी तत्परतेने करत असे. संध्याकाळी शाळेतून घरी परतताना विजू गल्लीच्या बोळापासून ओरडत यायचा, ’जिजी, मी आलो गं!“
अचानक विजूच्या वडिलांची बदली परदेशी झाली, अगदी कायमची! आपल्याला जीव लावणाऱ्या हृदयाच्या तुकड्याचा निरोप घेताना आजीच्या काळजाचे पाणी-पाणी झाले. मनावर दगड ठेवून तिने विजूला निरोप दिला. त्यानंतरच्या काळात वडील त्यांच्या कामात तर विजू आपल्या अभ्यासात, छंदवर्गात, मित्रांत व्यस्त असल्याने इकडचा काहीही संपर्क आला नव्हता. मधल्या कित्येक वर्षांचा हा काळ झरझर उडून गेला होता आणि आज अचानक विजू तिच्या भेटीला आला होता.
आजी खूपच आनंदित झाली. तिने विजूला जवळ घेतले. विजूनेही आपल्या जिजीकरता सुंदर भेटवस्तू आणल्या होत्या. हे सर्व पाहून आजी हरखून गेली. हे अनोखे प्रेम पाहून सर्वांनाच गहिवरून आले. या वयात आनंदाच्या कारंज्याप्रमाणे इतरांत उल्हास भरणाऱ्या आजीला दीर्घायुष्य लाभो, म्हणून मी मनोमन प्रार्थना केली.
तात्पर्य: मनापासून जुळलेली नाती कायम टिकून राहतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील शब्दांना एकत्र गुंफून सुंदर कथा तयार करा.
मैत्री → | दप्तर → | गृहपाठ → | रस्ता |
खालील कथालेखन करा.
महेंद्र नावाचा विद्यार्थी ______ हलाखीची परिस्थिती ______ रानात रोपट्यांचा शेंडा तुटलेला पाहाणे ______ मनात विचार ______ आत्मज्योत जागृत होणे ______ प्रयत्नांची पराकाष्ठा ______ यशस्विता ______ लेखक म्हणून प्रसिद्धी.
खालील कथालेखन करा.
रोहिणी नावाची मुलगी ______ कुटुंबात तिघी बहिणी ______ परिस्थिती सर्वसाधारण ______ रोहिणी हुशार ______ तिघींची जिद्द ______ शिक्षणाबरोबर शेतीकाम ______ मोठे स्वप्न ______ स्वप्न साकार _____ त्यांची पोलीस अधीक्षक, शिक्षिका व सनदी अधिकारी म्हणून नियुक्ती.
खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.
रमणलाल नावाच्या व्यापाऱ्याला तीन मुले होती. व्यापाराचा चांगला जम असल्यामुळे रमणलालची परिस्थिती अतिशय उत्तम होती. मुलांमध्ये मात्र नेहमी वाद-विवाद आणि भांडणं होत त्याला तो कंटाळला. त्याने एका मित्राच्या सल्ल्यानुसार त्याने आपल्या मुलांना जवळ बोलावून सांगितले की, माझं आता वय झाल्यामुळे यापुढे व्यापार तुम्ही बघावा. पण आधी मी तुमची परीक्षा घेईन त्यात जो पास होईल त्याच्या हातात मी व्यापार देईल. त्याने तिघा मुलांना सारखे पैसे वाटले आणि...
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
पळसाला पाने तीनच
खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
अति तिथं माती
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.
मुद्दे: अनाथ मुलगा – रोज सकाळी वर्तमानपत्राचे वाटप – दुपारी शाळेत – रस्त्यात एक पाकीट मिळते – वर्गशिक्षकांकडे देणे – पाकिटावरील पत्यावरून योग्य व्यक्तिपर्यंत पोहोचवणे – मालकाला आनंद – शाबासकी – मुलाला बक्षीस व त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे.
खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा.
(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही.)
पाडळी गावातील सखू आपल्या रानातला भाजीपाला घेऊन बाजाराला गेली. शेतातल्या कोवळ्या, ताज्या विकताना दिवस कधी संपला तिला कळलेच नाही. अजूनही थोडी भाजी शिल्लक होती. भाव कमी करून तिने ती विकली व सर्व साहित्य गोळा करून लगबगीने घराकडे निघाली. अर्ध्यारस्त्यात जाईपर्यंत काळोख दाटून आला. एक हुरहूर तिच्या मनात दाटून आली; पण नेटाने ती चालत होती. पावले भरभर उचलत होती. एवढ्यात तिला काळोखात सायकलचा आवाज आला. ती थबकली आणि .....
दिलेल्या कथेचा शेवट वाचा व त्याच्या आधारे कथेची सुरुवात लिहा.
____________________________________________________________ ____________________________________________________________ ____________________________________________________________ ____________ शेतकरीण आणलेल्या पाण्याचा थेंब नि थेंब जपायची, उपयोगात आणायची. बादलीभर पाण्यात भाजी धुऊन घ्यायची. त्याच पाण्याने घासलेल्या भांड्यांची पहिली राख धुऊन टाकायची, खरकटी भांडी विसळायची, मळकट हात धुवायची, मग बादलीतले पाणी वाफ्यात ओतायची. वाफ्यातल्या भाज्या, फुलझाडे बहरून यायची. हिरवी माया फुलली, भोळ्याभाबड्या शेतकरणीने चतुरपणाने पाण्याचा थेंब नि थेंब जपला होता. |
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.
एक कोल्हा - भूक लागते - द्राक्षांची बाग - खाण्याची इच्छा - द्राक्षांचा वेल उंच - उड्या मारतो - थकतो - आंबट द्राक्षे.