मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

खालील शीर्षकावरून कथालेखन करा. पळसाला पाने तीनच - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

पळसाला पाने तीनच

दीर्घउत्तर

उत्तर

पळसाला पाने तीनच

विश्वनाथ नावाच्या एक व्यापारी होता. त्याने आयुष्यभर खूप मेहनतीने संपत्ती मिळवली. म्हातारपणात मात्र कोणीही नातेवाईक नसल्याने या संपत्तीचे काय करावे असा प्रश्न त्या व्यापाऱ्यास पडला.

एवढी संपत्ती एखाद्या योग्य माणसाच्या हाती सोपवावी असा निश्चय त्याने केला. त्याकरता एका नि:स्वार्थी माणसाचा शोध घेत तो भटकू लागला. विश्वनाथला रस्त्यात एक व्यापारी भेटला. त्या व्यापाऱ्याला त्याने आपली समस्या सांगितली. व्यापारी लगेचच विश्वनाथशी गोड बोलू लागला. आपण किती मोठे समाजसेवक आहोत आणि आपण किती लोकांना मदत केली आहे, याचा पाढा तो विश्वनाथसमोर वाचू लागला. विश्वनाथला व्यापाऱ्याचा हेतू लक्षात आला. त्याने आपला मार्ग बदलत व्यापाऱ्यापासून आपला  पाठलाग सोडवला.

विश्वनाथला पुढे एक जमीनदार भेटला. विश्वनाथ बाहेर पडण्याचे कारण कळताच जमीनदारही आपल्याकडे असलेल्या जमिनींवर उगणारे धान्य आपण नि:स्वार्थीपणे दान करतो असे सांगू लागला. ऐशोआरामाचे जीवन जगणारा हा जमीनदार स्वार्थापोटी विश्वनाथची हाजी-हाजी करू लागला. त्याचे लक्षण ओळखून विश्वनाथ त्याच्यापासून दूर झाले.

विश्वनाथच्या मनात आले की, आपण एखाद्या साध्या माणसाला भेटावे. तेवढ्यात त्यांना समोरच्या देवळात देवपूजा करणारा पुजारी दिसला. त्याला पाहून विश्वनाथ खुलले. या पुजाऱ्याला स्वार्थाचा स्पर्शही नसावा असे मानून विश्वनाथ त्याच्याजवळ गेले. पुजाऱ्याला विश्वनाथचा हेतू कळताच पुजाऱ्याने मंदिरात येणाऱ्याना आपण किती मदत करतो ते सांगायला सुरुवात केली. आपण किती नि:स्वार्थी आहोत हे दर्शवण्याचा पुजाऱ्याचा प्रयत्न विश्वनाथच्या नजरेतून सुटला नाही. पुजाऱ्याचीही ही स्थिती पाहून मात्र विश्वनाथला 'पळसाला पाने तीनच' ही म्हण खऱ्या अर्थाने पटली. आपली सारी संपत्ती अनाथाश्रमास दान करून विश्वनाथ तेथून निघाला.

तात्पर्य: सर्व ठिकाणी परिस्थिती सारखीच असते.

shaalaa.com
कथालेखन
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 20.3: उपयोजित लेखन - कथालेखन

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi 10 Standard SSC
पाठ 20.3 उपयोजित लेखन
कथालेखन | Q आ. ६.
एससीईआरटी महाराष्ट्र Marathi (Second Language) 10 Standard SSC
पाठ 16.3 उपयोजित लेखन
कथालेखन ४ | Q आ. ६.

संबंधित प्रश्‍न

खालील अपूर्ण कथा पूर्ण करा.

दिवस कधी मावळला ते कळलेच नाही त्या दिवशी! पाहुण्यांनी घर भरून गेलं होतं. आजीच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण होत होती. सर्वजण या निमित्ताने एकत्र आलेले पाहून आजी तृप्त झाली होती. एकमेकांशी रक्ताने व मनाने जोडलेल्या तीन पिढ्या एकत्र जमल्या होत्या. दिवसभराच्या कार्यक्रमानंतर संध्याकाळी हास्यविनोदात, मनमोकळ्या गप्पांत सारेजण दंग होते आणि अगदी अचानक या गप्पांत एक अनोळखी आवाज ऐकू आला. ‘जिजी...मी आलो ग!’ खूप वर्षांनी आजीने हा आवाज ऐकला आणि ....

खालील शब्दांना एकत्र गुंफून सुंदर कथा तयार करा.

मैत्री  → दप्तर  → गृहपाठ  → रस्ता

खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा.

आंतरशालेय क्रीडास्पर्धा – धावण्याची स्पर्धा – शाळेतर्फे वरदचा सहभाग – वरद उत्तम धावपटू – सराव – उत्तम धावपटू तनयशी स्पर्धा – प्रत्यक्ष स्पर्धा – चुरशीची स्पर्धा – अचानक तनयचा पाय मुरगळणे – स्पर्धा सोडून वरदचे मदतीला धावणे – स्पर्धा हरूनही वरदचे कौतुक –


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

लक्ष्मण नावाचा तरुण----कैदेत----गावप्रमुखाचे कैदखान्याचे निरीक्षण करणे----लक्ष्मणची सुटकेसाठीची विनंती----सुटका व आर्थिक मदत----लक्ष्मण पक्षी घेऊन बाजारात----सर्व पक्षी पिंजऱ्यासहित विकत घेणे----पक्षी विक्रेत्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह----पक्ष्यांची पिंजऱ्यातून मुक्तता----मुक्ततेचा आनंद----बोध.


खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा. गुण (०५)

जंगलातील वृक्ष ______ चिमणीचे जोडपे ______ गुण्यागोविंदाने राहाणे ______ हत्तीचा धुमाकूळ पिले मारणे ______ चिमणा-चिमणीचा आक्रोश ______ सुतार पक्ष्याचा सल्ला व प्रेरणा ______ हत्तीची समजूत ______ बोध.


खालील कथालेखन करा.

महेंद्र नावाचा विद्यार्थी ______ हलाखीची परिस्थिती ______ रानात रोपट्यांचा शेंडा तुटलेला पाहाणे ______ मनात विचार ______ आत्मज्योत जागृत होणे ______ प्रयत्नांची पराकाष्ठा ______ यशस्विता ______ लेखक म्हणून प्रसिद्धी.


खालील कथालेखन करा.

रोहिणी नावाची मुलगी ______ कुटुंबात तिघी बहिणी ______ परिस्थिती सर्वसाधारण ______ रोहिणी हुशार ______ तिघींची जिद्द ______ शिक्षणाबरोबर शेतीकाम ______ मोठे स्वप्न ______ स्वप्न साकार _____ त्यांची पोलीस अधीक्षक, शिक्षिका व सनदी अधिकारी म्हणून नियुक्ती.


खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.

नंदुरबारच्या खर्डी या आदिवासी गावात रिंकी नावाची मुलगी दगड-मातीतून धावायची. सात भावंडांमध्ये पाचव्या नंबरची मुलगी होती. घरी कोरडवाहू शेती होती. त्यामुळे, तिच्या आई-वडिलांना इतरांच्या शेतात काम करणे व उन्हाळयाच्या दिवसात मजुरीसाठी गावाबाहेर पडावे लागायचे. सर्व भावंडे मात्र घरीच असायची. यातच मोठ्या भावाला पळण्याचे वेड असल्याने तो पळण्यात तरबेज झाला. पुढे जाऊन त्याने स्पर्धेत भाग घेतला. या धावण्याच्या वेडामुळेच पुढे जाऊन त्याला वनरक्षक होण्याचं भाग्य लाभलं. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन रिंकीसुद्धा धावू लागली आणि...


खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.

एका गावात रामकृष्ण आणि शेवंता नावाचं सामान्य परिस्थितीतील कुटुंब राहत होतं. त्यांना राकेश व प्रांजल नावाची दोन अपत्ये हाती. राकेश आणि प्रांजल दोघेही हुशार आणि आज्ञाधारक होती. अचानक सहा वर्षांची असतानाच प्रांजलची दृष्टी गेली. आईवडिलांना धक्का बसला; पण ते डगमगले नाहीत. त्यांनी तिचा शिक्षणाकडे असलेला ओढा, तिची जिद्द आणि चिकाटी पाहून तिला अंध मुलांच्या शाळेत घातले. तिची अभ्यासातील हुशारी, शिकण्याचा वेग, चिकाटी आणि मेहनत घेण्याची अभिलाषा पाहून शिक्षकांनीही तिची सर्वतोपरी मदत केली आणि पुढे ती...


खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.

रमणलाल नावाच्या व्यापाऱ्याला तीन मुले होती. व्यापाराचा चांगला जम असल्यामुळे रमणलालची परिस्थिती अतिशय उत्तम होती. मुलांमध्ये मात्र नेहमी वाद-विवाद आणि भांडणं होत त्याला तो कंटाळला. त्याने एका मित्राच्या सल्ल्यानुसार त्याने आपल्या मुलांना जवळ बोलावून सांगितले की, माझं आता वय झाल्यामुळे यापुढे व्यापार तुम्ही बघावा. पण आधी मी तुमची परीक्षा घेईन त्यात जो पास होईल त्याच्या हातात मी व्यापार देईल. त्याने तिघा मुलांना सारखे पैसे वाटले आणि...


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

कष्टाची गोड फळे


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

प्रामाणिकपणाचे फळ


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

बुद्धी आणि ताकदीचा मेळ


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

कोल्ह्याला द्राक्ष आंबट


खालील शीर्षकावरून कथालेखन करा.

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलहि गळे


खालील मुद्दयांच्या आधारे कथा लिहा:

एक गरीब मुलगा – शाळेची फी भरण्यास पैसे नसणे – सकाळी पेपर टाकण्याचे काम – वाटेत पैशाचे पाकीट मिळणे – प्रामाणिकपणे पोलिस स्टेशनवर नेऊन देणे – पाकिटाच्या मालकास आनंद – बक्षीस.


खालील मुद्द्यांवरून गोष्ट तयार करा.

मुद्दे: शाळेत जाणारा कष्टाळू – प्रामाणिक मुलगा – वाईट मित्रांची संगत – शिक्षकांना काळजी – मुलाला घेऊन बाजारात फेरफटका – उत्तम प्रतीच्या आंब्याची खरेदी – एक खराब झालेला आंबा – दोन दिवसांनी पाहणी – नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब – संदेश –


खालील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट पूर्ण करा.

हट्टी राजकन्या त्याला अर्धे राज्य मिळते
`↓` `↑`
राज्यकन्येची अट शेतकऱ्याचा मुलगा येतो
`↓` `↑`
न संपणारी गोष्ट सांगणे बरेच जण प्रयत्न करतात
`↓` `↑`
राज्यात दवंडी अर्धे राज्य

खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा.

(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही.)

पाडळी गावातील सखू आपल्या रानातला भाजीपाला घेऊन बाजाराला गेली. शेतातल्या कोवळ्या, ताज्या विकताना दिवस कधी संपला तिला कळलेच नाही. अजूनही थोडी भाजी शिल्लक होती. भाव कमी करून तिने ती विकली व सर्व साहित्य गोळा करून लगबगीने घराकडे निघाली. अर्ध्यारस्त्यात जाईपर्यंत काळोख दाटून आला. एक हुरहूर तिच्या मनात दाटून आली; पण नेटाने ती चालत होती. पावले भरभर उचलत होती. एवढ्यात तिला काळोखात सायकलचा आवाज आला. ती थबकली आणि .....


दिलेल्या कथेचा शेवट वाचा व त्याच्या आधारे कथेची सुरुवात लिहा.

____________________________________________________________

____________________________________________________________

____________________________________________________________

____________ शेतकरीण आणलेल्या पाण्याचा थेंब नि थेंब जपायची, उपयोगात आणायची. बादलीभर पाण्यात भाजी धुऊन घ्यायची. त्याच पाण्याने घासलेल्या भांड्यांची पहिली राख धुऊन टाकायची, खरकटी भांडी विसळायची, मळकट हात धुवायची, मग बादलीतले पाणी वाफ्यात ओतायची. वाफ्यातल्या भाज्या, फुलझाडे बहरून यायची. हिरवी माया फुलली, भोळ्याभाबड्या शेतकरणीने चतुरपणाने पाण्याचा थेंब नि थेंब जपला होता.


खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचाराने व कल्पनेने कथा पूर्ण करा.

आज शाळेमध्येखो खोच्या संघाचे आंतरशालेय सामने सुरू होणार होते. सकाळी ७ वाजताच शाळेचा सर्व संघ मैदानावर हजर होता. सर्वांच्याच मनात उत्सुकता, उत्साह, चैतन्य संचारले होते. सलीम आमच्या संघाचा कर्णधार मात्र अजून यायचा होता. आम्ही सर्वजण त्याची आतुरतेने वाट पाहत होतो. सलीम अजून का येत नाही म्हणून चिंतीतही होतो. पंचांनी दोन्ही संघांना मैदानात पाचारण केले. संघात कुजबुज सुरू झाली आणि तेवढ्यात धापा टाकत सलीम मैदानावर आला आणि...

तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या व कथेचे तात्पर्य लिहा.


तुम्ही कथा तयार करताना व लिहिताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या याची यादी करा.


खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.

प्रकाश आणि अन्वर जीवश्चकंठश्च मित्र. एकाच वर्गात, एकाच बाकावर बसणारे, एकत्र डबा खाणारे सच्चे सोबती. दिवाळीची सुट्टी लागली आणि अन्वर आईबरोबर गावाला गेला. आता सुट्टी संपेपर्यंत हे मित्र भेटणार नव्हते. दिवाळीची सुट्टी संपायला दोन दिवस होते. प्रकाशला अन्वरच्या भेटीची ओढ लागली होती. सुट्टीतला अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रकाशने दप्तर काढले. पुस्तकात त्याला अन्वरने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. त्याने उत्सुकतेने चिठ्ठी वाचायला घेतली आणि.....
  • तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या.
  • कथा तयार करताना व लिहिताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या? ते लिहा.

पुढील मुद्दयांवरुन कथालेखन करा.

मुद्दे - एक राजा - त्याची प्रजा आळशी होती - त्यांना उद्योगी बनवण्यासाठी राजा युक्ती करतो - रस्त्यात मधोमध दगड ठेवतो - त्यांच्याखाली - सोन्याची नाणी असलेली पिशवी - अनेक लोक जातात, पण दगड उचलत नाहीत - एक गरीब माणूस तो उचलतो - पिशवीतील नाणी त्याला मिळतात - लोकांना हे कळते - लोक उद्योगी बनतात -


खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा:

(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही.)

शाळेची घंटी वाजली. शाळा सुटल्याच्या आनंदात सर्व विद्यार्थी गडबडीने बाहेर पडू लागले. वरच्या मजल्यावरून श्रेया आणि नेहा धावतच बाहेर पडल्या. सिटीबसमध्ये जागा मिळत नाही म्हणून त्या भरभर चालत होत्या. शेवटीत्या बस थांब्याजवळ पोहोचल्या आणि ...

खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.

एक कोल्हा - भूक लागते - द्राक्षांची बाग - खाण्याची इच्छा - द्राक्षांचा वेल उंच - उड्या मारतो - थकतो - आंबट द्राक्षे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×