Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
भाग बाजार
उत्तर
भाग बाजार ही एक अशी विशिष्ट जागा आहे की जेथे विविध प्रकारच्या प्रतिभूतींची खरेदी विक्री केली जाते. प्रतिभूती या संकल्पनेत म्युच्युअल फंडचे युनिट, समहक्क भाग, अग्रहक्क भाग, कर्जरोखे, सरकारी प्रतिभूती, बंधपत्रे इत्यादींचा समावेश होतो. भाग बाजार हे गुंतवणूकदार व कर्जघेणाऱ्या कंपन्या यांच्यातील मध्यस्थ म्हणून काम करतात. गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची सुरक्षितता व स्थिरता देण्यासाठी भारतातील भाग बाजारांचे सेबीद्वारे नियमन केले जाते.
सन १५७१ मध्ये स्थापन झालेला लंडन भाग बाजार हा जगातील सर्वात जुना भाग बाजार आहे. तर सन १८७५ मध्ये स्थापन झालेला मुंबई (बॉम्बे) भाग बाजार (Bombay Stock Exchange) हा भारतातील सर्वात जुना भाग बाजार आहे.
प्रतिभूती करार(नियमन) कायदा १९५६ नुसार भाग बाजार म्हणजे ‘‘प्रतिभूतींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी मदत करणे, त्यांचे नियंत्रण व नियमन करण्याच्या उद्देशानेस्थापन केलेली, कायदेशीर नोंदणी असलेली वा नसलेली व्यक्तींची संघटना, संस्था किंवा मंडळ होय.’’