Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संज्ञा उदाहरणांसहित स्पष्ट करा.
विस्थापन अभिक्रिया
टीपा लिहा
उत्तर
संयुगातील कमी क्रियाशील मूलद्रव्याच्या आयनाची जागा दुसरे जास्त क्रियाशील असलेले मूलद्रव्य स्वतः आयन बनून घेते, त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात.
उदा., जर दाणेदार जस्त कॉपर सल्फेट द्रावणात टाकले असता, कॉपर (Cu2+) आयनांची जागा Zn अणूपासून तयार झालेले Zn2+ हे आयन घेतात व Cu2+ आयनांपासून तयार झालेले Cu अणू CuSO4 मधून बाहेर पडतात. म्हणजेच Zn मुळे CuSO4 मधील Cu चे विस्थापन होते.
\[\ce{\underset{\text{जस्त}}{Zn_{(s)}} + \underset{\text{कॉपर सल्फेट}}{CuSO4_{(aq)}} -> \underset{\text{झिंक सल्फेट}}{ZnSO4_{(aq)}} + \underset{\text{कॉपर}}{Cu_{(s)}}}\]
shaalaa.com
रासायनिक अभिक्रियांचे प्रकार (Types of chemical reactions) - विस्थापन अभिक्रिया (Displacement reaction)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?