Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संक्षिप्त टिपा लिहा.
जन्मदर आणि मृत्युदरातील सहसंबंध.
उत्तर १
- जन्मदर आणि मृत्युदर हे लोकसंख्या बदलाचे महत्त्वाचे घटक आहेत.
- जन्मदर म्हणजे दर हजार लोकसंख्येमागे एका वर्षात होणाऱ्या जन्मांची संख्या.
- मृत्यूदर म्हणजे दर हजार लोकसंख्येमागे एका वर्षात होणाऱ्या मृत्यूंची संख्या.
- लोकसंख्येची वाढ ही जन्मदर आणि वर्षातील मृत्युदरावर अवलंबून असते. लोकसंख्या वाढ केवळ जन्मदर वाढल्यानेच होत नाही तर घटत्या मृत्युदरामुळे देखील होते.
- जन्मदर मृत्युदरापेक्षा जास्त असताना लोकसंख्या वाढते.
- जन्मदर मृत्युदरापेक्षा कमी असताना लोकसंख्या कमी होते.
- जर जन्मदर आणि मृत्युदर दोन्ही समान असतील तर लोकसंख्या स्थिर राहते असे म्हटले जाते. तथापि, जन्मदर आणि मृत्युदर समान असणे ही केवळ एक काल्पनिक परिस्थिती आहे.
उत्तर २
जन्मदर आणि मृत्युदरामुळे लोकसंख्येत वाढ किंवा घट होते. मात्र, लोकसंख्येतील ही वाढ किती होणार आहे की लोकसंख्येत घट होणार आहे ही बाब जन्मदर आणि मृत्युदरातील तफावतीवर अवलंबून असते. जन्मदर आणि मृत्युदर दोन्ही जास्त असल्यास लोकसंख्या कमी असते, तसेच स्थिरही असते. जन्मदर जास्त मात्र मृत्युदर घटत असल्यास लोकसंख्या वाढत जाते. जन्मदर जास्त व मृत्युदर कमी या टप्प्यात लोकसंख्येत प्रचंड वाढ होते, हीच लोकसंख्या स्फोटाची स्थिती असते. जन्मदर घटत असल्यास आणि मृत्युदर कमी होत असल्यास लोकसंख्येत अत्यल्प वाढ होते आणि पुढे पुढे लोकसंख्या स्थिर होत जाते. जन्मदर खूप कमी आणि मृत्युदरही खूप कमी असल्यास लोकसंख्या कमी असते, मात्र ती स्थिर असते. काही वेळेस तर जन्मदर कमी आणि मृत्युदर जास्त अशी परिस्थिती उद्भवते आणि तेव्हा त्या देशाची किंवा प्रदेशाची लोकसंख्या प्रत्यक्षात कमी होत जाते. त्यालाच लोकसंख्येची नकारात्मक वाढ असेही म्हणतात.