Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संक्षिप्त टिपा लिहा.
शिकार व परिसंस्थेचा ऱ्हास
उत्तर १
शेतीच्या विकासापूर्वी, अन्न मिळविण्यासाठी शिकार करणे हा मानवाचा एक महत्त्वाचा व्यवसाय होता. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या शिकारीमुळे अनेक प्राण्यांच्या प्रजाती नामशेष होत होत्या. म्हणूनच, अनेक देशांमध्ये परिसंस्थेचे रक्षण करण्यासाठी व्यावसायिक शिकार करण्यास बंदी आहे. प्राणी आणि परिसंस्थेचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी अनेक कायदे केले जात आहेत. तरीही, टुंड्रा प्रदेशातील एस्किमो, विषुववृत्तीय सेल्वासचे पिग्मी, कालाहारीचे बुशमेन, अंदमानमधील सेंटिनल्स इत्यादी अनेक आदिवासी अजूनही शिकार करत आहेत.
उत्तर २
अन्नासाठी मानव प्राचीनकाळी विविध प्राण्यांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करीत असे. त्यातूनच शिकार या एक प्रमुख प्राथमिक व्यवसायाची सुरुवात झाली. पुढे दीर्घकाळ मानव शिकारीच्या साह्याने आपला चरितार्थ चालवत असे. मात्र याचा परिणाम म्हणून प्राण्यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. त्यामुळे जगातील अनेक भागात अनेक महत्त्वाचे पशुपक्षी कायमचे नामशेष झाले, तर काही पशुपक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काळाच्या ओघात मानवाचे पर्यावरण विषयक ज्ञान आणि समजही वाढली आणि प्राण्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न केले जाऊ लागले. त्याच वेळेस शेती, पशुपालन यांसारख्या इतर प्राथमिक व्यवसायांच्या विकासामुळे अन्नाचे इतर स्रोत उपलब्ध झाले. तसेच प्राणी आणि पक्ष्यांच्या संवर्धनासाठी जगातील बहुतांश देशांनी शिकारीवर बंदी घातली.