Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे. त्याचा अर्थ काय? पांढरा रंग प्रकाशाचा सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे आणि त्यावरील अशोकचक्र काय सांगते? ते सद्गुणांची, धर्माची खूण सांगते. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू, सत्यमय राहू असा त्याचा अर्थ आहे. आपल्या वर्तनाची ही सूत्रेराहू देत. या चक्राचा आणखी काय अर्थ आहे? चक्र म्हणजे गती. हे चक्र सांगते, की गतिमान राहा. केशरी रंग त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे आणि हिरवा रंग म्हणजे हरितश्यामल भूमातेचा. या ध्वजाखाली उभे राहून सेवावृत्तीने व निरहंकारीपणाने आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्मूया. |
१. चौकटी पूर्ण करा.
(अ) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचा निदर्शक-
(आ) झेंड्याचा केशरी रंग गुणांचा निदर्शक-
(इ) झेंड्याचा हिरवा रंग गुणांचा निदर्शक-
२. झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत स्पष्ट करा.
उत्तर
१. (अ) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचा निदर्शक- प्रकाश, सत्य व साधेपणा
(आ) झेंड्याचा केशरी रंग गुणांचा निदर्शक- त्याग व नम्रता
(इ) झेंड्याचा हिरवा रंग गुणांचा निदर्शक- हरितश्यामल भूमाता
२. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि तिरंगा डौलात फडकू लागला. तिरंग्यात केशरी, पांढरा व हिरवा असे तीन रंग आहेत. त्यांपैकी 'केशरी' रंग हा त्यागाचे व नम्रतेचे प्रतीक आहे. या देशासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्यांच्या त्यागाचे ते स्मरण आहे. भारत ही साधूसंतांची भूमी आहे, म्हणूनही या केशरी रंगाचे महत्त्व आहे. त्यानंतर येणारा पांढरा रंग हा प्रकाश, सत्य व साधेपणाचे प्रतीक आहे. या रंगामुळे शांतता व पावित्र्याचे दर्शन घडते. या पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर एक अशोकचक्र आहे. ते गतिमानता, सद्गुण व धर्माची खूण आहे. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय, सत्यमय राहून काम करायला हवे, असा संदेश ते देते.
तर हिरवा रंग हा हिरव्यागार, सस्यश्यामल भूमातेचे प्रतीक आहे. हा रंग धनधान्याची समृद्धी, भरभराट दर्शवतो. अशाप्रकारे, या 'तिरंगा' ध्वजाखाली उभे राहून आपण सर्वांनी सेवावृत्तीने, कोणताही अहंकार मनी न बाळगता पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करूया, असा संदेश 'तिरंगा' सदैव देत असतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
तक्ता पूर्ण करा.
अ.क्र. | वाट बघणारा | कोणाची वाट बघतो | वाट बघण्याचे कारण |
(१) | चकोर | चंद्रकिरण हेच त्याचे जीवन | |
(२) | माहेरचे बोलावणे येणे | ||
(३) | भुकेलेले बाळ | ||
(४) | पांडुरंगाची |
व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा.
व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.
व्यायामाने जडत्व वाढते.
‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.
सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.
घटक | त्यांचे सजणे |
(१) लिंबोणी | |
(२) नागफणी | |
(३) घाणेरी | |
(४) पळसफुले |
‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
भुलावी तहान विसरावी भूक, कारण......
खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.
गोष्टी | परिणाम |
वीज चमकणे |
‘मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद’ या काव्यपंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा.
आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.
खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.
शेतकरी पेरणीसाठी वापरतो ते अवजार
खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.
काया ढेकलात डोया हिर्व सपन पाहेते
कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
कवितेचा विषय | कवितेतील पात्र | कवितेतील तुम्हांला सर्वांत आवडलेले प्रतिक | कवितेतील नैसर्गिक घटना |