Advertisements
Advertisements
प्रश्न
‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
उत्तर
राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांनी 'व्यायामाचे महत्त्व' या कवितेत मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व स्पष्ट केले आहे.
व्यायाम केल्याने अंगातील आळस दूर होतो. अंगी उत्साह संचारतो. पचनशक्ती सुधारते व रक्ताभिसरण संस्था उत्तमप्रकारे कार्य करू लागते. शरीरातील स्नायू बळकट होण्यास मदत होते. माणसाचे आयुष्य वाढते. कफ, पित्त, वात इत्यादी विकारांचा नाश होतो. रोगाचा प्रतिकार करण्याची शक्ती वाढते. विचारशक्ती वाढते. म्हणजेच, सुदृढ शरीरासोबतच मानसिक, बौद्धिक आरोग्यही सुधारते.
तसेच, व्यायाम करण्यामुळे स्वत:चे काम स्वत:च करण्याची स्वावलंबी वृत्ती निर्माण होते. कोणतेही काम करण्यासाठी शरीर व मन तितकेच उत्साही असते, म्हणूनच 'व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।' असे कवी म्हणतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य अर्थ शोधा.
वाटुली म्हणजे ______.
संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हांला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.
‘ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिले देवालया।।’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.
संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
व्यायामाने जडत्व वाढते.
व्यायामाने स्नायू अशक्त होतात.
व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
आरोग्य देणारी -
व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा.
व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.
कारण लिहा.
कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण .............
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.
घटक | त्यांचे सजणे |
(१) लिंबोणी | |
(२) नागफणी | |
(३) घाणेरी | |
(४) पळसफुले |
सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...
खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.
गोष्टी | परिणाम |
वारा घुमणे |
खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.
काकरात बिजवाई जस हासरं चांदनं
या कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
वऱ्हाडी शब्द | प्रमाणभाषेतील शब्द |