Advertisements
Advertisements
प्रश्न
‘ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिले देवालया।।’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर
'संतकृपा झाली' या अभंगात संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाच्या उभारणीतील संत ज्ञानेश्वरांचे योगदान वर्णन केले आहे.
संतांच्या कृपेमुळे वारकरी संप्रदायरूपी इमारतीची जडणघडण झाली. संत ज्ञानेश्वरांनी या संप्रदायाला वैचारिक, आध्यात्मिक व तात्त्विक बैठक दिली. समाजातील सर्व घटकांना समतेने वागण्याची शिकवण देऊन एकाच छताखाली आणले. 'ज्ञानेश्वरी', 'हरिपाठ', 'अमृतानुभव' या ग्रंथांची रचना करून ज्ञानाची कवाडे सर्वदूर खुली केली. सर्वसामान्य लोकांना भक्ती करण्याचा, ज्ञान घेण्याचा अधिकार मिळवून दिला. अशाप्रकारे, ज्ञानेश्वरांनी या वारकरी संप्रदायरूपी देवालयाची भक्कम पायाभरणी केली. या बळकट पायामुळेच संपूर्ण देवालयाचा डोलारा त्याच्यावर उभारला गेला, असे प्रस्तुत ओळीद्वारे बहिणाबाई सांगत आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हांला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.
चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.
व्यायामाने जडत्व वाढते.
व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
आरोग्य देणारी -
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
स्वतःची कामे स्वतः करणारा -
व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...
खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.
गोष्टी | परिणाम |
वारा घुमणे |
आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.
खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.
काकरात बिजवाई जस हासरं चांदनं
‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.