Advertisements
Advertisements
प्रश्न
व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर
मानवी जीवनात व्यायामाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, कारण नियमित व्यायाम केल्याने अनेक रोग टाळता येतात व शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते. व्यायामाने मानसिक आरोग्यही चांगले राहते. नैराश्य, मरगळ, अस्वस्थता कमी होते. योगासने, एरोबिक्स, दंड, बैठका, जोर, सूर्यनमस्कार, प्राणायाम अशा व्यायामप्रकारांमुळे स्नायू बळकट होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. भूक वाढते. अन्नपचन सुधारते. तसेच वजन नियंत्रित राहण्यासही मदत होते. उत्साह टिकून राहतो, रक्ताभिसरण क्रिया सुधारते. शरीरात चैतन्य संचारते, जडत्व निघून जाते. त्यामुळे कोणतेही कार्य करण्यासाठी माणूस नेहमी तयार असतो. अशाप्रकारे, मानवी जीवनात व्यायामाचे आरोग्यदायी मित्राइतके महत्त्वपूर्ण स्थान आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
तक्ता पूर्ण करा.
अ.क्र. | वाट बघणारा | कोणाची वाट बघतो | वाट बघण्याचे कारण |
(१) | चकोर | चंद्रकिरण हेच त्याचे जीवन | |
(२) | माहेरचे बोलावणे येणे | ||
(३) | भुकेलेले बाळ | ||
(४) | पांडुरंगाची |
योग्य अर्थ शोधा.
आस लागणे म्हणजे ______.
चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
आरोग्य देणारी -
कारण लिहा.
जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण .............
पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.
‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...
खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.
गोष्टी | परिणाम |
वारा घुमणे |
आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी ‘पुन्हा एकदा’ काय व्हावे असे तुम्हांस वाटते, ते स्वतःच्या शब्दांत सविस्तर लिहा.
खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.
शेतकरी पेरणीसाठी वापरतो ते अवजार
खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.
काया ढेकलात डोया हिर्व सपन पाहेते
या कवितेत आलेले वऱ्हाडी बोलीतील शब्द शोधा व त्यांना प्रमाणभाषेतील शब्द लिहा.
वऱ्हाडी शब्द | प्रमाणभाषेतील शब्द |
कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
कवितेचा विषय | कवितेतील पात्र | कवितेतील तुम्हांला सर्वांत आवडलेले प्रतिक | कवितेतील नैसर्गिक घटना |
‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे. त्याचा अर्थ काय? पांढरा रंग प्रकाशाचा सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे आणि त्यावरील अशोकचक्र काय सांगते? ते सद्गुणांची, धर्माची खूण सांगते. या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू, सत्यमय राहू असा त्याचा अर्थ आहे. आपल्या वर्तनाची ही सूत्रेराहू देत. या चक्राचा आणखी काय अर्थ आहे? चक्र म्हणजे गती. हे चक्र सांगते, की गतिमान राहा. केशरी रंग त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे आणि हिरवा रंग म्हणजे हरितश्यामल भूमातेचा. या ध्वजाखाली उभे राहून सेवावृत्तीने व निरहंकारीपणाने आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्मूया. |
१. चौकटी पूर्ण करा.
(अ) झेंड्याचा पांढरा रंग गुणांचा निदर्शक-
(आ) झेंड्याचा केशरी रंग गुणांचा निदर्शक-
(इ) झेंड्याचा हिरवा रंग गुणांचा निदर्शक-
२. झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत स्पष्ट करा.