मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

खालील उतारा वाचून एका वाक्यात उत्तरे येतील असे चार प्रश्‍न तयार करा: आळशी माणूस हा सतत आरामाची अपेक्षा करीत असतो, तर खरा काम करणारा माणूस 'आराम हराम है' असे मानतो. रात्रीची पाच-सहा तास झोप ही - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उतारा वाचून एका वाक्यात उत्तरे येतील असे चार प्रश्‍न तयार करा:

आळशी माणूस हा सतत आरामाची अपेक्षा करीत असतो, तर खरा काम करणारा माणूस 'आराम हराम है' असे मानतो. रात्रीची पाच-सहा तास झोप ही विश्रांतीसाठी पुरेशी असते. इतर वेळी त्याने सतत काम करीत रहावे. उगाचच बसून राहिल्याने अंगात आळस वाढतो. उलट प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की काळ हा सतत पुढे जात असतो. तो कोणासाठीही थांबत नसतो. आपण तो आळसात व्यर्थ दवडला तर आपला कार्यभाग साधणार नाही. सतत तेच काम करीत राहिल्यास कंटाळा येतो, म्हणून तर सहा दिवस काम केल्यावर रविवारी सुट्टी येते, त्या दिवशी आळसात लोळत पडण्यापेक्षा माणसाने छंदात रमून जावे.
लेखन कौशल्य

उत्तर

  1. आळशी माणूस सतत कोणती अपेक्षा करीत असतो?
  2. विश्रांतीसाठी किती तासांची झोप पुरेशी असते?
  3. उगाच बसून राहिल्याने काय वाढते?
  4. रविवारी माणसाने काय करावे?
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×