मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (इंग्रजी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: दात दुखायला लागला, की तो मुळापासून दुखू लागतो. किंबहुना दाताला मूळ असते हे फक्त तो दुखायला लागला म्हणजेच कळते. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

दात दुखायला लागला, की तो मुळापासून दुखू लागतो. किंबहुना दाताला मूळ असते हे फक्त तो दुखायला लागला म्हणजेच कळते. माझा दात जेव्हा दुखायला लागला तेव्हा तर माझी खात्रीच झाली, की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यांत फार फरक असला पाहिजे. आपल्या दाताला मूळ नसून झाडांसारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यांत सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत. नाहीतर सगळेच दात दुखत असल्याचा भास मला का व्हावा? प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर ज्या दाताने शंख करायला लावला, तो दुखरा दात याची खात्री झाली. दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही ! बरे, हे दुखणे तरी साधे, सरळ असावे? तेही नाही. एखाद्या कवीच्या मनातील जिप्सीसारखा एखादा लाकूडतोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एकघाव घालीत असतो. असे म्हणतात, की दिवसा सभ्य दिसणारी माणसे रात्री आपल्या खऱ्या रूपात फिरतात. दात हा अवयवही अशाच माणसांसारखा असावा. नाहीतरी दिवसा अधूनमधून पण सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अक्राळविक्राळ का होतो? दातांत आणि चोरांत साम्य असते ते याच बाबतीत. दोघेही रात्री गडबड करतात.

(१) जेव्हा दात दुखतो तेव्हा लेखकाला होणारे साक्षात्कार -   (२)

(य) ______

(र) ______

(२) दुखऱ्या दाताबद्दलची लेखकाची मते:     (२)

(य) ______

(र) ______

(३) स्वमत अभिव्यक्ती:      (४)

लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळविक्राळ राक्षसाशी केलेली आहे, याबाबत तुमचे मत लिहा.

किंवा

दातदुखीच्या कथा-व्यथा तुमच्या शब्दांत लिहा.

आकलन

उत्तर

(१) जेव्हा दात दुखतो तेव्हा लेखकाला होणारे साक्षात्कार -

(य) दात हेच सत्य आहे व जग मिथ्या आहे.

(र) पत्नी आणि मुले केवळ एक भास वाटतात.

(२) दुखऱ्या दाताबद्दलची लेखकाची मते:

(य) दाताचे चित्र आणि खरे दात यामध्ये स्पष्ट फरक असायला हवा.

(र)  दात हे सहावे महाभूत.

(३) 

दातदुखीच्या भयानक वेदनांचा अनुभव आपल्यापैकी बहुतेकांना परिचित आहे. या वेदना इतक्या तीव्र असतात की सहन करणे कठीण होते. लेखकाने दातदुखीच्या प्रसंगाचे केलेले अचूक निरीक्षण आपल्याला स्वतःच्या दातदुखीची आठवण करून देते.

दातदुखीच्या ठणक्यांमुळे असे वाटते जणू दाढेच्या मुळाशी एखादा लकूडतोड्या सतत घाव घालत आहे. डॉक्टरांनी दिलेले औषध काही काळासाठी आराम देते, पण वेदना पुन्हा सुरू होतात. प्रत्येक ठणक वेदना कपाळापर्यंत पोहोचवतो, जणू डोकं फोडून बाहेर पडेल की काय, असे वाटत राहते. या वेदना इतक्या भीषण असतात की लेखकाने दिलेली अक्राळविक्राळ राक्षसाची उपमा अगदी योग्य वाटते.

दिवसा सभ्य वाटणारा दात रात्री प्रचंड ठणकायला लागतो. ठणक सुरू झाल्यावर बोंबा मारण्याशिवाय काहीही करता येत नाही. दातदुखीच्या वेदना सहन करणाऱ्यालाच लेखकाने दिलेली ही भीषण उपमा योग्य वाटेल.

किंवा

परशा पहलवानाच्या दातदुखीचा प्रसंग लेखक विस्ताराने वर्णन करतात. परशा चार-आठ दिवसांतून एखाद्या वेळी दात घासायचा, पण त्याने कधीच दातांची योग्य काळजी घेतली नव्हती. त्यामुळे त्याचा एक दात खूप दुखत होता. लेखक त्याला विचारतात, “सिंहाचे कधी दात दुखतात का?” यावर परशाचे मजेशीर उत्तर येते, “कसला सिंह घिऊन बसलाय मर्दा!” आणि तो त्याच्या दुखऱ्या दाताची दर्दभरी कथा सांगतो. शेवटी तो म्हणतो, “अरं सिंहच काय, नरसिंह आला तरी दातांसमोर काही चालणार नाही!”

थोड्याच दिवसांनी, लेखकालाही एक दात कारण नसताना ठणकू लागतो. दुखणे इतके वाढते की लेखकाची अवस्था अत्यंत हालाखीची होते. लेखक दातदुखीचे मार्मिक वर्णन करतात, ज्या काळात शेजारी गोळा होतात आणि प्रत्येकजण दातदुखीवर चर्चा करू लागतो, जणू परिसंवादच सुरू असतो. शेवटी, लेखक दुखणारा दात काढून टाकण्याचा निर्णय घेतात आणि त्यांचे दातदुखीचे प्रकरण येथेच संपते.

shaalaa.com
दंतकथा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official

संबंधित प्रश्‍न

कारणे शोधा व लिहा.

लेखकाला दातांबद्दल अजिबात प्रेम नाही, कारण...


कारणे शोधा व लिहा.

दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये असे लेखकाला वाटते, कारण...


कृती करा.

दातांशी निगडित म्हणी व शब्दप्रयोग यांची लेखकाच्या मते वैशिष्ट्ये


कृती करा.

दातासंबंधीच्या लेखकाच्या कल्पना


कृती करा.

दात दुखताना लेखकाला होणारे साक्षात्कार


स्वभाववैशिष्ट्ये लिहा.

परशाची स्वभाववैशिष्ट्ये


स्वभाववैशिष्ट्ये लिहा.

लेखकाची स्वभाववैशिष्ट्ये


चौकटी पूर्ण करा.

लेखकाच्या मते सहावे महाभूत. ______


चौकटी पूर्ण करा.

लेखकाने दुखऱ्या दाताला दिलेली उपमा. ______


चौकटी पूर्ण करा.

ऐटीत चालणारा परशा म्हणजे जणू. ______


चौकटी पूर्ण करा.

लेखकाच्या मते जन्मात एकही दात न दुखणारा माणूस असा असतो. ______


चौकटी पूर्ण करा.

लेखकाच्या मते कवीने दाताला दिलेली उपमा. ______


स्वमत.

पाठातील विनोद निर्माण करणारी पाच वाक्ये शोधा. ती तुम्हांला का आवडली ते सकारण लिहा.


स्वमत.

लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळविक्राळ राक्षसाशी केलेली आहे, याबाबत तुमचे मत लिहा.


स्वमत.

लेखकाच्या दातदुखीबाबत शेजाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या संदर्भात एक छोटे टिपण तयार करा.


अभिव्यक्ती.

प्रस्तुत पाठ तुम्हांला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा.


दिलेल्या उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, की दहा-बारा वर्षांपूर्वी दंतवैद्याबद्दलच्या खऱ्याखुऱ्या दंतकथा ऐकल्या होत्या, त्यावरून दंतवैद्याची खुर्ची, दात उपटण्याची क्रिया इत्यादी सर्व गोष्टींबद्दल माझ्या मनात विक्राळ भीती होती; पण प्रत्यक्षात तसे काही वाटले नाही. दंतवैद्य अलीकडे फारच माणसाळलेले आहेत असे माझे प्रामाणिक मत झाले. त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन देऊन इतका लीलया दात उपटला, की मी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिलो! दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते. मी आजवर शत्रूंना आणि शेजाऱ्यांना भांडणाच्या वेळी ‘दात उपटून हातात ठेवीन’, ‘दात घशात घालीन’ अशा माझ्या शक्तीचे प्रदर्शन करणाऱ्या धमक्या दिल्या होत्या. त्यांना काहीच अर्थ नव्हता, याची हळहळ दंतवैद्याच्या खुर्चीत असतानाच वाटली.

दंतवैद्याने दात दाखवला. हाच तो खलदंत! ज्याने माझे बायकोपुढे हसे केले तोच हा नीच दात. नतद्रष्ट! ‘तुला हेच शासन योग्य आहे’ असे मी उरलेले दातओठ खाऊन मनाशी म्हणालो. आता पुन्हा तो ठणका लागणार नाही, पुन्हा ते बोळे धरावे लागणार नाहीत. पुन्हा बायकोचा उपदेश ऐकावा लागणार नाही. ह्या विचारांनी मी आनंदाने बेहोश झालो. उरलेल्या दातांना धाक बसावा म्हणून तो काढलेला दात घरी नेण्याचा विचार मनात येऊन गेला; पण त्या दाताची संगतसुद्धा नको असे वाटून मी तो दंतवैद्यालाच अर्पण केला. आनंदाने घरी आलो. दारातूनच ओरडून चार-पाच शेजाऱ्यांना सांगितले, की ‘‘तो तुम्हांला जागवणारा दात गेला. यापुढे दंतसप्ताह नाही.’’

(१) (२)

(i) 

(ii) 

(२) दंतवैद्याने दात काढल्यानंतर लेखक आश्चर्यचकित का झाले? (२)

(३) स्वमत अभिव्यक्ती: (४)

लेखकाच्या मनातील दंतवैद्याविषयाची प्रतिक्रिया तुमच्या भाषेत लिहा.

किंवा

लेखकाने शेजाऱ्यांना ओरडून काय सांगितले? उदाहरणासह लिहा.


खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(१) लेखकाने शक्तिप्रदर्शन करताना दिलेल्या धमक्या - (२)

(य) ______

(र) ______

(२) दंतवैद्याने केलेल्या दोन क्रिया - (२)

(य) ______

(र) ______

           दंतवैद्य अलीकडे फारच माणसाळलेले आहेत असे माझे प्रामाणिक मत झाले. त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन देऊन इतका लीलया दात उपटला, की मी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिलो! दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते. मी आजवर शत्रूंना आणि शेजाऱ्यांना भांडणाच्या वेळी ‘दात उपटून हातात ठेवीन’, ‘दात घशात घालीन’ अशा माझ्या शक्तीचे प्रदर्शन करणाऱ्या धमक्या दिल्या होत्या. त्यांना काहीच अर्थ नव्हता, याची हळहळ दंतवैद्याच्या खुर्चीत असतानाच वाटली.

           दंतवैद्याने दात दाखवला. हाच तो खलदंत! ज्याने माझे बायकोपुढे हसे केले तोच हा नीच दात. नतद्रष्ट! ‘तुला हेच शासन योग्य आहे’ असे मी उरलेले दातओठ खाऊन मनाशी म्हणालो. आता पुन्हा तो ठणका लागणार नाही, पुन्हा ते बोळे धरावे लागणार नाहीत. पुन्हा बायकोचा उपदेश ऐकावा लागणार नाही. ह्या विचारांनी मी आनंदाने बेहोश झालो. उरलेल्या दातांना धाक बसावा म्हणून तो काढलेला दात घरी नेण्याचा विचार मनात येऊन गेला; पण त्या दाताची संगतसुद्धा नको असे वाटून मी तो दंतवैद्यालाच अर्पण केला. आनंदाने घरी आलो. दारातूनच ओरडून चार-पाच शेजाऱ्यांना सांगितले, की ‘‘तो तुम्हांला जागवणारा दात गेला. यापुढे दंतसप्ताह नाही.’’

(३) स्वमत अभिव्यक्ती - (४)

‘यापुढे दंतसप्ताह नाही,’ लेखकाच्या या विधानाची कारणमीमांसा तुमच्या शब्दांत लिहा.

किंवा

दातदुखीच्या कथा-व्यथा सोदाहरण लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×