मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

खालील वारंवारता वितरण सारणीत 200 रुग्णांची वये आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांची एका आठवड्यातील संख्या दिली आहे. त्यावरून रुग्णांच्या वयाचे बहुलक काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वारंवारता वितरण सारणीत 200 रुग्णांची वये आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांची एका आठवड्यातील संख्या दिली आहे. त्यावरून रुग्णांच्या वयाचे बहुलक काढा.

वय (वर्षे) 5 पेक्षा कमी 5 - 9 10 - 14 15 - 19 20 - 24 25 - 29
रुग्णसंख्या 38 32 50 36 24 20
बेरीज

उत्तर

वर्ग
वय (वर्षे)
सलग वर्ग वारंवारता
रुग्णसंख्या
5 पेक्षा कमी 0 - 4.5 38
5 - 9 4.5 - 9.5 32 → f0
10 - 14 9. 5 - 14.5 50 → f1
15 - 19 14.5 - 19.5 36 → f2
20 - 24 19.5 - 24.5 24
25 - 29 24.5 - 29.5 20

येथे जास्तीत जास्त वारंवारता 50 आहे.

∴ 9.5 - 14.5 हा बहुलकीय वर्ग आहे.

आता, L = 9.5, h = 5, f1 = 50, f0 = 32, f2 = 36

∴ बहुलक = `"L" + [(f_1 - f_0)/(2f_1 - f_0 - f_2)]h`

`= 9.5 + [(50 - 32)/(2(50) - 32 - 36)]5`

= 9.5 + `(18/(100 - 68))5`

= 9.5 + 2.8125

= 12.3125 ≈ 12.31

∴ रुग्णांच्या वयाचे बहुलक सुमारे 12.31 वर्षे आहे. (अंदाजे)

shaalaa.com
वर्गीकृत वारंवारता वितरणावरून बहुलक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: सांख्यिकी - सरावसंच 6.3 [पृष्ठ १४९]

APPEARS IN

बालभारती Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 6 सांख्यिकी
सरावसंच 6.3 | Q 4 | पृष्ठ १४९

संबंधित प्रश्‍न

एका दूध संकलन केंद्रावर शेतकऱ्यांकडून संकलित केलेले दूध व लॅक्टोमीटरने मोजलेले दुधातील (फॅटचे) स्निग्धांशाचे प्रमाण दिले आहे. त्यावरून दुधातील स्निग्धांशाच्या प्रमाणाचे बहुलक काढा.

दुधातील स्निग्धांश (%) 2 - 3 3 - 4 4 - 5 5 - 6 6 - 7
संकलित दूध (लीटर) 30 70 80 60 20

काही कुटुंबांचा मासिक वीजवापर पुढील वर्गीकृत वारंवारता सारणीत दिला आहे. त्यावरून वीजवापराचे बहुलक काढा.

वीजवापर (युनिट) 0 - 20 20 - 40 40 - 60 60 - 80 80 - 100 100 - 120
कुटुंबांची संख्या 13 50 70 100 80 17

चहाच्या 100 हॉटेलांना पुरवलेले दूध व हॉटेलांची संख्या यांची वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून पुरवलेल्या दुधाचे बहुलक काढा.

दूध (लीटर) 1 - 3 3 - 5 5 - 7 7 - 9 9 - 11 11 - 13
हॉटेलांची संख्या 7 5 15 20 35 18

प्रत्येक विद्यार्थ्याने लावलेली झाड 1 - 3 4 - 6 7 - 9 10 - 12
विद्यार्थी संख्या 7 8 6 4

वरील वारंवारता सारणीतील सामग्रीसाठी वारंवारता बहुभुज काढायचा आहे. 4 – 6 या वर्गातील विद्यार्थी दर्शवण्यासाठीच्या बिंदूंचे निर्देशक ________ आहे.


खालील वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीत एका मिठाईच्या दुकानातील विविध वजनांच्या मिठाईची मागणी दिली आहे. त्यावरून वजनाच्या मागणीचे बहुलक काढा.

मिठाईचे वजन (ग्रॅम) 0 - 250 250 - 500 500 - 750 750 - 1000 1000 - 1250
ग्राहक संख्या 10 60 25 20 15

खालील वारंवारता वितरण सारणीत एका पेट्रोलपंपावर पेट्रोल भरणाऱ्या वाहनांची संख्या आणि वाहनांमध्ये भरलेले पेट्रोल याची माहिती दिली आहे. त्यावरून वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचे बहुलक काढण्याची कृती पूर्ण करा:

वर्ग
(भरलेले पेट्रोल लीटरमधे)
वारंवारता
(वाहनांची संख्या)
0.5 − 3.5 33
3.5 − 6.5 40
6.5 − 9.5 27
9.5 − 12.5 18
12.5 − 15.5 12

कृती:

दिलेल्या सारणीवरून,

बहुलकीय वर्ग = `square`

∴ बहुलक = `square + [(f_1-f_0)/(2f_1-f_0 - square)]xxh`

∴ बहुलक = `3.5 + [(40-33)/(2(40)-33-27)]xx square`

∴ बहुलक = `3.5 + [7/(80 - 60)] xx 3`

∴ बहुलक = `square`

∴ वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचा बहुलक `square` आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×