Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधान सकारण स्पष्ट करा.
भांडवल बाजार व्यवसाय क्षेत्रासाठी उपयुक्त आहे.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- ज्या ठिकाणी व्यावसायिक संस्थांना आवश्यक असणाऱ्या दीर्घ मुदतीचे भांडवल घेतले किंवा दिले जाते त्या बाजाराला भांडवल बाजार असे म्हणतात.
- देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा भांडवल बाजार एक महत्त्वाचा घटक आहे जो संसाधने गतिशील करण्यास मदत करतो.
- भांडवल बाजारामध्ये दोन्ही विक्रीयोग्य आणि विक्रीयोग्य नसलेल्या प्रतिभूतींचे व्यवहार होतात. विक्रीयोग्य प्रतिभूती हस्तांतरित केल्या जाऊ शकतात. उदा. भाग, कर्जरोखे इ. आणि विक्रीयोग्य नसलेल्या प्रतिभूती हस्तांतरित केल्या जाऊ शकत नाहीत. उदा. मुदत ठेव, कर्ज आणि आगाऊ रक्कम.
- या बाजारामध्ये व्यवसाय संस्था, औदयोगिक संस्था, वित्तीय संस्था देशांतर्गत आणि विदेशी दोन्ही बाजारांमधून दीर्घ मुदतीच्या निधी उभारतात.
- भांडवली बाजाराचा अर्थव्यवस्थेत भांडवल निर्मितीमध्येही हातभार लागतो.
- त्यामुळे भांडवल बाजार व्यवसाय क्षेत्रासाठी उपयुक्त आहे.
shaalaa.com
वित्तीय बाजाराचे प्रकार - भांडवल बाजार
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?