Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयावर संक्षिप्त टिप लिहा.
पूर्व वैदिक काळातील भारतीय स्त्रियांचे स्थान
टीपा लिहा
उत्तर
- पूर्व वैदिक काळातील स्त्रियांचे सामाजिक स्थान तुलनेने अधिक उच्च दर्जाचे होते.
- पूर्व वैदिक काळातील स्त्रियांना वेदांचे शिक्षण घेण्याची मुभा होती. त्यांना उपनयन संस्काराचा अधिकार होता. त्यामुळे त्यांना गुरूगृही राहून शिक्षण घेता येत असे.
- अशा स्त्रियांचे दोन प्रकार ऋग्वेदात सांगितलेले आहेत: ‘सद्यवधू’ म्हणजे उपनयनाचा संस्कार पूर्णहोताच गुरूगृही न जाता़ विवाह होऊन सासरी पाठवल्या गेलेल्या मुली. ‘ब्रह्मवादिनी’ म्हणजे उपनयनाचा संस्कार प्राप्त झाल्यानंतर वेदांचे शिक्षण घेऊन वेदविद्येत पारंगत झालेल्या स्त्रिया. त्या आजन्म अविवाहीत राहूऩ वेदांचे अध्ययन आणि अध्यापन करत असत.
- स्त्रियांची भूमिका समाजोपयोगी आणि अर्थोत्पादक समजली जात होती.
- त्यांना ‘विदथ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सामाजिक सभांमध्ये सहभागी होता येत असे. त्यांना आयुष्याचा जोडीदार स्वतः निवडण्याची मुभा होती.
- पूर्व वैदिक काळात सामाजिक आणि कायदेशीर हक्कांच्या दृष्टीने स्त्रियांचे स्थान उत्तर वैदिक काळाशी तुलना केली असता अधिक मानाचे होते परंतु तेव्हाही ते पुरुषांच्या बरोबरीचे नव्हतेच.
shaalaa.com
प्राचीन आणि मध्ययुगीन भारत
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?