Advertisements
Advertisements
प्रश्न
कोलकाता येथील ______ हे भारतातील पहिले संग्रहालय होय.
पर्याय
गव्हर्नमेंट म्युझियम
राष्ट्रीय वस्तूसंग्रहालय
छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय
भारतीय संग्रहालय
उत्तर
कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय होय.
स्पष्टीकरण:
कोलकाता येथील 'भारतीय संग्रहालय' हे भारतातील पहिले संग्रहालय 'एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल' या संस्थेतर्फे इसवी सन १८१४ मध्ये स्थापन झाले. आजमितीला भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक संग्रहालये आहेत. बहुतेक मोठ्या संग्रहालयांची स्वतःची अभिलेखागारे आणि ग्रंथालये असतात. काही संग्रहालये विद्यापीठांशी संलग्न असतात. अशा संग्रहालयांतर्फे संग्रहालयशास्त्र या विषयाचे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या ______ या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात आहे.
पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा:
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.
पुढील आकृतिबंध पूर्ण करा.
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई: इसवी सन १९०४ साली मुंबईतीत काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारतभेटीच्या स्मरणार्थ एक वस्तुसंग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. इसवी सन १९०५ च्या नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली आणि संग्रहालयास नाव 'प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया' असे निश्चित करण्यात आले. इसवी सन १९९८ मध्ये संग्रहालयाचे नाव बदलून 'छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय' असे ठेवण्यात आले. संग्रहालयाची वास्तू-गोथिक शैलीत बांधलेली आहे. तिला मुंबई शहरातील 'पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत' असा दर्जा देण्यात आलेला आहे. संग्रहालयात कला, पुरातत्त्व आणि निसर्गाचा इतिहास अशा तीन वर्गांत विभागलेल्या सुमारे पन्नास हजार पुरावस्तू संग्रहित केलेल्या आहेत. |
१. 'प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया' या म्युझियमची पायाभरणी केव्हा झाली?
२. या संग्रहालयाची वास्तू कोणत्या शैलीत बांधण्यात आलेली आहे?
३. 'छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय' ची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
थोडक्यात टिपा लिहा.
लुव्र संग्रहालय