मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. १. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया या म्युझियमची पायाभरणी केव्हा झाली? २. या संग्रहालयाची वास्तू कोणत - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई: इसवी सन १९०४ साली मुंबईतीत काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारतभेटीच्या स्मरणार्थ एक वस्तुसंग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. इसवी सन १९०५ च्या नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली आणि संग्रहालयास नाव 'प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया' असे निश्चित करण्यात आले. इसवी सन १९९८ मध्ये संग्रहालयाचे नाव बदलून 'छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय' असे ठेवण्यात आले. संग्रहालयाची वास्तू-गोथिक शैलीत बांधलेली आहे. तिला मुंबई शहरातील 'पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत' असा दर्जा देण्यात आलेला आहे. संग्रहालयात कला, पुरातत्त्व आणि निसर्गाचा इतिहास अशा तीन वर्गांत विभागलेल्या सुमारे पन्नास हजार पुरावस्तू संग्रहित केलेल्या आहेत. 

१. 'प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया' या म्युझियमची पायाभरणी केव्हा झाली?

२. या संग्रहालयाची वास्तू कोणत्या शैलीत बांधण्यात आलेली आहे?

३. 'छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय' ची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

टीपा लिहा

उत्तर

१. इसवी सन १९०४ साली 'प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया' या म्युझियमची पायाभरणी झाली.

२. या संग्रहालयाची वास्तू इंडो-गोथिक शैलीत बांधण्यात आलेली आहे.

३.

१. इंडो-गोथिक या शैलीत छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाची वास्तू बांधलेली आहे. अलीकडच्या काळात या संग्रहालयाला मुंबई शहरातील 'पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत' असा दर्जा देण्यात आलेला आहे.

२. संग्रहालयामध्ये सुमारे पन्नास हजार पुरातन वस्तू संग्रहित असून त्या कला, पुरातत्त्व आणि निसर्गाचा इतिहास या तीन वर्गांत विभागलेल्या आहेत.

shaalaa.com
काही नावाजलेली संग्रहालये
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.9: ऐतिहासिक ठेव्यांचे जतन - लांब उत्तरे १

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
पाठ 1.9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
लांब उत्तरे १ | Q ४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×