Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.
कारण सांगा
उत्तर १
- इतिहास संशोधन करताना इतिहासाची साधने मिळवणे, सूची तयार करणे, साधनांचे जतन करणे, ती प्रदर्शित करणे अशी विविध कामे काळजीपूर्वक करावी लागतात.
- प्रत्येक कामाचे कौशल्य वेगवेगळे असते. प्रत्येक कामाची कृती वेगवेगळी असते. पूर्वतयारीही वेगवेगळी करावी लागते.
- या सर्व कृती करताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे, हे माहीत असले पाहिजे. प्रशिक्षणाखेरीज या बाबी कळू शकत नाहीत; म्हणून इतिहास संशोधन करताना विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.
shaalaa.com
उत्तर २
- इतिहासाच्या साधनांसंबंधित विविध कृती केल्या जातात. त्या पुढीलप्रमाणे आहेत.
- इतिहासाची साधने मिळवणे, त्यांच्या नोंदी करणे व त्यांची सूची तयार करणे.
- जुने ग्रंथ, हस्तलिखिते, पुरावस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधने यांची साफसफाई करणे आणि ही ऐतिहासिक साधने प्रदर्शित करणे.
- वरील सर्व कृती इतिहासाच्या साधनांच्या जतन व संवर्धनासाठी अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. म्हणूनच, योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच या कृती करता येत असल्याने विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.
shaalaa.com
इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?