मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेचे वर्गीकरण कशाच्या आधारे व कसे केले जाते? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेचे वर्गीकरण कशाच्या आधारे व कसे केले जाते?

थोडक्यात उत्तर

उत्तर

कृत्रिम उपग्रहांच्या भ्रमणकक्षेचे तीन प्रकारे वर्गीकरण करता येते :

उपग्रहांच्या विविध कक्ष

(१) भ्रमणकक्षेचे स्वरूप : उपग्रहांची भ्रमणकक्षा ही वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार असू शकते.
(२) भ्रमणकक्षेचा पृथ्वीच्या विषुववृत्ताशी कोन : कृत्रिम उपग्रहाची भ्रमणकक्षा ही विषुववृत्ताला समांतर किंवा कोन करणारी असू शकते.
(३) भ्रमणकक्षेची उंची : कृत्रिम उपग्रहाची भ्रमणकक्षा भूपृष्ठापासून किती उंचीवर आहे, त्यानुसार भ्रमणकक्षेचे तीन उपप्रकार पडतात :
(i) उच्च कक्षा उपग्रह : पृथ्वीच्या भूपृष्ठापासून 35780 km किंवा अधिक उंचीवरील कृत्रिम उपग्रहांना उच्च कक्षा उपग्रह म्हणतात.
(ii) मध्यम कक्षा उपग्रह : पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 2000 km ते 35780 km या उंचीदरम्यान असलेल्या उपग्रहांना मध्यम कक्षा उपग्रह म्हणतात.
(iii) निम्न कक्षा उपग्रह : पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 180 km ते 2000 km या दरम्यान असलेल्या कृत्रिम उपग्रहांना निम्न कक्षा उपग्रह म्हणतात.

shaalaa.com
कृत्रिम उपग्रहांचे वर्गीकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: अवकाश मोहीमा - स्वाध्याय [पृष्ठ १४४]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 10 अवकाश मोहीमा
स्वाध्याय | Q ३. आ. | पृष्ठ १४४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×