Advertisements
Advertisements
प्रश्न
लिहीते व्हा.
महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर झालेला परिमाण.
दीर्घउत्तर
उत्तर
संत बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर झालेला परिणाम खालीलप्रमाणे सांगता येईल:
- कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला. त्यांनी जातिभेदाला विरोध केला.
- श्रमप्रतिष्ठेला महत्त्व सांगितले. त्यांचे 'कायकवे कैलास' हे प्रसिद्ध वचन आहे. त्याचा अर्थ श्रम हाच कैलास होय, असा आहे.
- आपल्या चळवळीमध्ये स्त्रियांनाही सहभागी करून घेतले. ‘अनुभवमंटप’ या सभागृहामध्ये होणाऱ्या धर्मचर्चेत सर्व जातींचे स्त्री-पुरुष सहभागी होऊ लागले.
- त्यांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेमध्ये वचनसाहित्याच्या माध्यमातून दिली. त्यांच्या अनुयायांनी त्यांचे कार्य मराठीतही लिहिले. त्यांच्या या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?