Advertisements
Advertisements
प्रश्न
लिहीते व्हा.
संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले.
लघु उत्तर
उत्तर
- भक्ती चळवळीतील संत कबीर यांनी जाती, पंथ, धर्म यांवरून माणसा-माणसांत भेदभाव केला नाही.
- सर्व माणसे समान आहेत, असा त्यांनी उपदेश केला.
- तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तीपूजा यांना महत्व न देता त्यांनी सत्यालाच ईश्वर मानले.
- हिंदू व मुस्लीम या धर्मांतील कट्टर लोकांवर कठोर टीका करून त्यांच्यात ऐक्य साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
त्यांच्या या कार्यामुळे ते एक विख्यात संत म्हणून उदयास आले.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?