Advertisements
Advertisements
प्रश्न
लोकसंख्या घनता ही लोकसंख्या आणि क्षेत्रफळावर अवलंबून असते.
टीपा लिहा
उत्तर
लोकसंख्येच्या अभ्यासात एखाद्या प्रदेशाची निव्वळ लोकसंख्या प्रादेशिक तुलनेसाठी वापरणे योग्य ठरत नाही. याला कारण प्रत्येक देशाचे क्षेत्रफळ हे वेगळे असते आणि त्यामुळे लोकसंख्येच्या वितरणात प्रादेशिक तुलनात्मक अभ्यासासाठी क्षेत्रफळ आणि लोकसंख्या यांचे गुणोत्तर मोजणे अत्यावश्यक ठरते. लोकसंख्या घनता म्हणजे प्रदेशाचे क्षेत्रफळ आणि एकूण लोकसंख्या यांचे गुणोत्तर होय. म्हणजेच एकूण लोकसंख्येला एकूण क्षेत्रफळाने भागल्यास जी संख्या येते ती त्या प्रदेशाची लोकसंख्या घनता दर्शवते. थोडक्यात, लोकसंख्या घनता ही केवळ संख्या नसून ती त्या प्रदेशाच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते.
shaalaa.com
लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक - लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक - प्राकृतिक घटक
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?