मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

'माणसे पेरा! माणुसकी उगवेल!' या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

'माणसे पेरा! माणुसकी उगवेल!' या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

'माणसे पेरा। माणुसकी उगवेल' या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ 'मनक्या पेरेन लागा' या कवितेच्या आधारे सविस्तर लिहा.

थोडक्यात उत्तर

उत्तर १

मातीत बीज पेरलं की, मातीच्या कष्टमय मायेतून त्याचे झाड होते. माती त्या बीजाला सगळ्या नैसर्गिक आपत्तींपासून वाचवते. दुष्काळाशी लढते. बीजाची मायेने निगराणी करते. या सर्व प्रक्रियेतून बीजाचा वृक्ष होतो. त्याप्रमाणेच आजच्या मूल्यहीन समाजामध्ये चांगल्या संस्काराच्या मातीत जर माणसांना पेरले, तर त्यातून मानवतेचा निकोप वृक्ष उभा राहील, अशी आशादायक भावना या विधानातून व्यक्त झाली आहे. नवविचारांच्या नवसमाजात माणुसकीला बहर येईल व मानवजात सुखी होईल, असा सर्जनशील आशय 'माणसे पेरा! माणुसकी उगवेल!' या विधानातून व्यक्त होतो.

shaalaa.com

उत्तर २

समाजात नष्ट होण्याच्या मार्गावर असलेली माणुसकी टिकवण्यासाठी तिचे बीज रुजवणे अत्यंत आवश्यक आहे. जर पेरलेले बीज उत्तम असेल, तर त्यातून उगवणारे रोपही तितकेच चांगले असेल. मात्र, केवळ चांगले बीज रुजवून थांबणे पुरेसे नाही; त्याची योग्य प्रकारे काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. माणुसकीचे बीज अंकुरल्यानंतर त्याचे संगोपन करणे आणि संस्कारांचे खतपाणी घालून ते चांगले वाढवणे हे अत्यंत कौशल्यपूर्ण काम आहे. जर माणसाच्या स्वभावातील या गुणांना योग्य खतपाणी मिळाले, तर जगात सर्वत्र सुव्यवस्थेची निर्मिती होईल. 'पेराल तसे उगवते' या म्हणीप्रमाणे, जर प्रत्येक मनावर माणुसकीचे संस्कार रुजवले गेले, आणि माणसाच्या मनात माणुसकीचे बीज चांगले अंकुरले, तर जग सुखाचा स्वर्ग होईल, यात शंका नाही.

shaalaa.com
मनक्या पेरेन लागा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10.2: मनक्या पेरेन लागा - कृती [पृष्ठ ३८]

APPEARS IN

बालभारती Marathi - Kumarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 10.2 मनक्या पेरेन लागा
कृती | Q (३) | पृष्ठ ३८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×