Advertisements
Advertisements
प्रश्न
मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीतील त्रुटी लिहा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- कोबाल्ट (Co) व निकेल (Ni) या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीत संदिग्धता होती.
- मेंडेलीव्हने आवर्तसारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला. समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान तर अणुवस्तुमाने भिन्न असल्यामुळे त्यांना मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीत जागा कशा प्रकारे द्यावयाची हे एक मोठे आव्हान उभे राहिले.
- वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांमधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही. त्यामुळे दोन जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचे भाकित करणे मेंडेलीव्हच्या आवर्ती नियमानुसार शक्य नव्हते.
- हायड्रोजनचे स्थान : हायड्रोजन हा हॅलोजनांशी (गण VII) साम्य दर्शवतो, जसे की हायड्रोजनचे रेणुसूत्र H2 आहे, तर फ्लुओरिन, क्लोरीन यांची रेणुसूत्रे अनुक्रमे F2, Cl2 अशी आहेत. तसेच हायड्रोजन व अल्क धातू (गण I) यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्येही साधर्म्य आहे. हायड्रोजन व अल्क धातू (Na, K, इत्यादी.) यांनी क्लोरीन व ऑक्सिजन यांच्याबरोबर तयार केलेल्या संयुगांच्या रेणुसूत्रांमध्ये साधर्म्य आहे. वरील गुणधर्मांचा विचार केल्यावर हायड्रोजनची जागा अल्क धातूंच्या गणात (गण I) की हॅलोजनांच्या गणात (गण VII) हे ठरवता येत नाही.
shaalaa.com
मेंडेलीव्हची आवर्तसारणी (Mendeleev’s Periodic table)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
थोडक्यात टिपा लिहा.
मेंडेलीव्हचा आवर्ती नियम
थोडक्यात टिपा लिहा.
समस्थानकांचे मेंडेलीव्हच्या व आधुनिक आवर्तसारणीतील स्थान
मेंडेलिव्हच्या वेळी _____ मूलद्रव्ये ज्ञात होती.
शून्य गणांतील मूलद्रव्यांना ______ म्हणतात.
एका बोरॉन : स्कँडिअम :: एका ॲल्युमिनिअम : ______
काही जागांवर दोन मूलद्रव्ये : न्युलँडस्च्या अष्टक नियमातील त्रुटी : : समस्थानिकांसाठी जागा : _________
जोड्या जुळवा.
क्र. | 'अ' गट | 'ब' गट | |
1) | एका ॲल्युमिनिअम | अ) | स्कँडिअम |
2) | एका सिलिकॉन | ब) | गॅलिअम |
3) | एका बोरॉन | क) | जर्मेनिअम |
ड) | बेरिलिअम् |
मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमानुसार मूलद्रव्यांचे गुणधर्म हे ________.
नावे लिहा.
गण 1 मधील मूलद्रव्याचे कुल.
आवर्तसारणीची रचना करताना मेंडेलिव्हने मूलद्रव्यांचे रासायनिक व भौतिक गुणधर्म विचारात घेतले.