Advertisements
Advertisements
प्रश्न
मळ्याची शेती
उत्तर
मळ्याची शेती ही व्यापारी तत्त्वावर केवळ व्यापारासाठी केली जाते. मळ्याच्या शेती क्षेत्र फार विस्तृत असते आणि जास्त भांडवलाची आवश्यकता असते. विस्तृत शेती क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणावर मजुरांचा वापर केला जातो. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान देखरेखीसाठी व जंतुनाशके कीटकनाशकांच्या फवारण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर शेतात केला जातो. या शेतीत प्रामुख्याने चहा, कॉफी, कोको, रबर या प्रमुख नगदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. आशियातील काही देशात या शेती प्रकारात मसाल्यांचे पदार्थ, काजू व केळी या पिकांचे उत्पादन घेतले जाते. विस्तृत क्षेत्रात एका प्रमुख पिकांची लागवड केली जाते, त्यामुळे या शेती प्रकारास एकपिकी शेती असेही म्हटले जाते. विषुववृत्तीय प्रदेशात प्रामुख्याने मळ्याची शेती केंद्रित झाली आहे. तसेच देशांप्रमाणे विशेषीकरण दिसून येते. उदा., ब्राझील देश कॉफीसाठी, घाना आयव्हरी कोस्ट आहे आफ्रिकेतील देश कोको साठी मलेशिया, इंडोनेशिया हे देश रबरासाठी, तर आशियातील भारत व श्रीलंका हे देश चहा व मसाल्याच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. या शेतीचे हेक्टरी उत्पादन कमी असते. मात्र एकूण उत्पादन जास्त असते. ही शेती झाडे किंवा वृक्ष आधारित असल्यामुळे एकदा लागवड केल्यानंतर या शेतीतून दहा ते पंधरा वर्षे सलग उत्पादन घेतले जाते. मळ्याच्या शेतीस काही प्रमुख समस्याही भेडसावत आहेत. वाहतूक साधनांचा अभाव, भांडवलाची कमतरता, अधिकारी कीटकनाशकांमुळे प्रदूषण आणि विस्तृत शेत जमिनीमुळे तेथील निगा राखण्यात अडचणी येणाऱ्या मजुरांचे प्रश्न आणि एकपिकी शेती क्षेत्रामुळे पर्यावरणातील झालेल्या बदलामुळे होणारे संभाव्य नुकसान या समस्यांचा सामना मळ्याच्या शेतीक्षेत्रात करावा लागतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये ______.
सांगड घालून साखळी पूर्ण करा:
'अ' स्तंभ | 'ब' स्तंभ | 'क' स्तंभ |
सखोल उदरनिर्वाह शेती | डॉगर बँक | शेतीचा आकार लहान |
पंपाज गवताळ प्रदेश | किनाऱ्यापासून दूर, खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन | प्रतिकूल परिस्थिती |
मत्स्यक्षेत्र | तांदूळ | बॉम्बे हाय |
फळे, कंदमुळे गोळा करणे | घनदाट वने | ईशान्य अटलांटिक महासागर |
खाणकाम | व्यापारी पशुपालन | दक्षिण अमेरिका |
भौगोलिक कारणे दया.
भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.
विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे.
फरक सांगा.
मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती.
सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल माहिती लिहा.
मंडई बागायती शेतीची वैशिष्ट्ये लिहा.
शेती व्यवसायात खंडनिहाय गुंतलेल्या लोकसंख्येची २०१८ सालची आकडेवारी खालील तक्त्यात दिलेली आहे. त्या आधारे सुयोग्य आलेख काढून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
खंड | प्राथमिक व्यवसायात गुंतलेली लोकसंख्येची टक्केवारी (सन २०१८) |
युरोप | ७.९१ |
आशिया | २४.४९ |
उत्तर अमेरिका | १४.९३ |
दक्षिण अमेरिका | १४.९४ |
आफ्रिका | ४७.२८ |
ऑस्ट्रेलिया | २७.७९ |
संदर्भ स्रोत: FAO- २०१८
१) कोणत्या खंडात १०% पेक्षा कमी लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे?
२) कोणत्या खंडात ४०% पेक्षा जास्त लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे?
३) दिलेल्या आकडेवारीकडे बघता, या खंडांना तिथल्या आर्थिक विकासाच्या स्तरानुसार चढत्या क्रमाने लावता येईल काय?
विस्तृत व्यापारी धान्य शेतीचा आकार लहान असतो.