मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

शेती व्यवसायात खंडनिहाय गुंतलेल्या लोकसंख्येची २०१८ सालची आकडेवारी खालील तक्त्यात दिलेली आहे. त्या आधारे सुयोग्य आलेख काढून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शेती व्यवसायात खंडनिहाय गुंतलेल्या लोकसंख्येची २०१८ सालची आकडेवारी खालील तक्त्यात दिलेली आहे. त्या आधारे सुयोग्य आलेख काढून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

खंड प्राथमिक व्यवसायात गुंतलेली लोकसंख्येची टक्केवारी (सन २०१८)
युरोप ७.९१
आशिया २४.४९
उत्तर अमेरिका १४.९३
दक्षिण अमेरिका १४.९४
आफ्रिका ४७.२८
ऑस्ट्रेलिया २७.७९

संदर्भ स्रोत: FAO- २०१८

१) कोणत्या खंडात १०% पेक्षा कमी लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे?

२) कोणत्या खंडात ४०% पेक्षा जास्त लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे?

३) दिलेल्या आकडेवारीकडे बघता, या खंडांना तिथल्या आर्थिक विकासाच्या स्तरानुसार चढत्या क्रमाने लावता येईल काय?

तक्ता

उत्तर

टीप : प्रश्नात दिलेल्या तक्त्यामध्ये केवळ प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकांची टक्केवारी दिली आहे. या पूर्ण तक्त्याची बेरीज केल्यास ती १०० च्याही पलीकडे जाताना दिसते. याचा अर्थ ही खंडनिहाय तुलनात्मक टक्केवारी नसून, प्रत्येक खंडातील एकून लोकसंख्येपैकी प्राथमिक व्यवसायात असलेल्या लोकांची टक्केवारी आहे. उदा., युरोपमध्ये केवाट ७.९१ टक्के लोकनंख्या प्राथमिक व्यवसायात आहे. याचा अर्थ उर्वरित ९२.०८ टक्के लोकसंख्या प्राथमिकेतर व्यवसायात गुतलेली आहे. म्तणून येथे संयुक्त स्तंभालेखाचा उपयोग करून एकूण लोकसंख्येपैकी प्राथमिक आणि प्राथमिकेतर व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या स्तंभालेखाद्वारे दाखवली आहे.

१) युरोप खंडात १०% पेक्षा कमी लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे.

२) आफ्रिका खंडात ४०% पेक्षा अधिक लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे.

३) प्राथमिक व्यवसायात कार्यरत लोकसंख्येचा विचार करता, खंडांची आर्थिक विकासाच्या स्तरानुसार चढत्या क्रमाने पुढीलप्रमाणे मांडणी केली आहे. (त्यासाठी ज्या खंडात प्राथमिकेतर व्यवसायांचे प्रमाण जास्त, त्या खंडाला क्रमवारीत वरचा क्रमांक दिला आहे.)
१. युरोप २. उत्तर अमेरिका ३. दक्षिण अमेरिका ४. ऑस्ट्रेलिया ५. आशिया ६. आफ्रिका.

shaalaa.com
प्राथमिक व्यवसाय - शेती
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: प्राथमिक आर्थिक क्रिया - स्वाध्याय [पृष्ठ ४१]

APPEARS IN

बालभारती Geography (Social Science) [Marathi] 12 Standard HSC
पाठ 4 प्राथमिक आर्थिक क्रिया
स्वाध्याय | Q ८. | पृष्ठ ४१

संबंधित प्रश्‍न

विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये ______.


सांगड घालून साखळी पूर्ण करा:

'अ' स्तंभ 'ब' स्तंभ 'क' स्तंभ
सखोल उदरनिर्वाह शेती डॉगर बँक शेतीचा आकार लहान
पंपाज गवताळ प्रदेश किनाऱ्यापासून दूर, खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन प्रतिकूल परिस्थिती
मत्स्यक्षेत्र तांदूळ बॉम्बे हाय
फळे, कंदमुळे गोळा करणे घनदाट वने ईशान्य अटलांटिक महासागर
खाणकाम व्यापारी पशुपालन दक्षिण अमेरिका

मळ्याची शेती


भौगोलिक कारणे दया.

भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.


विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे.


फरक सांगा.

मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती.


सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल माहिती लिहा.


मंडई बागायती शेतीची वैशिष्ट्ये लिहा.


विस्तृत व्यापारी धान्य शेतीचा आकार लहान असतो.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×