Advertisements
Advertisements
प्रश्न
मृदा परीक्षणाची शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरज व महत्त्व काय आहे?
लघु उत्तर
उत्तर
शेतकऱ्याला उत्तम पीक काढणे अपेक्षित असते. मृदेचे परीक्षण केल्याने शेतकऱ्याला त्याच्या शेतजमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते. मृदा परीक्षण केल्यानंतर शेतकऱ्याला मृदेचा रंग, पोत तसेच त्यातील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण समजते. मृदेमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे व ती दूर कशी करावी याचे उपाय कोणते हे मृदापरीक्षणातून समजते. मातीचा सामू (pH) आणि विद्युतवाहकता या दोन परिक्षणाचा शेतकऱ्याला खूप फायदा होतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?