Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:
नियंत्रित बाजार हा असा घाऊक बाजार असतो की, जेथील खरेदी-विक्रीचे व्यवहार राज्य सरकार बाजार समिती मार्फत नियंत्रित करते. नियंत्रित बाजाराचा प्रमुख उद्देश विक्रेते आणि उत्पादक यांना विविध सुविधा उपलब्ध करून देणे तसेच बाजारातील अनैतिक, अनिष्ठ प्रथा आणि अप्रामाणिकपणा, फसवेगिरी यांचे प्रमाण नियंत्रित करणे हे असते. प्रामुख्याने कृषी विपणन बाजारात प्राथमिक आणि दुय्यम बाजारपेठेतील चुकीची मानके जसे की रोखीचे व्यवहार, कमी वजने, जास्त बाजार शुल्क, अनधिकृत कपाती तसेच विक्रेते आणि खरेदीदार यांच्यातील वाद मिटविण्यासाठी यंत्रणेचा अभाव यासारखे अडथळे आहेत. सर्व दोष आणि अडथळे नियंत्रित बाजाराच्या स्थापनेद्वारे दूर केले जाते. १९३९ मध्ये करण्यात आलेल्या ‘बॉम्बे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट मार्केट ॲक्ट’ नुसार या बाजारपेठा नियंत्रित केल्या जातात. या बाजारपेठांमध्ये प्रामुख्याने तृणधान्य, फळे, तंबाखू, कापूस, भुईमूग, धान्य, नारळ, सुपारी, बटाटे आणि हळद यांचा व्यापार नियंत्रित केला जातो. |
- कोणत्या ॲक्टनुसार बाजारपेठा नियंत्रित केल्या जातात? (१)
- प्राथमिक आणि दुय्यम बाजारपेठेतील चुकीची मानके कोणती? (१)
- वरील उतार्याविषयी आपले मत लिहा. (२)
उत्तर
- १९३९ मध्ये करण्यात आलेल्या ‘बॉम्बे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट मार्केट ॲक्ट’ नुसार बाजारपेठा नियंत्रित केल्या जातात.
- प्राथमिक आणि दुय्यम बाजारपेठेतील चुकीची मानके जसे की रोखीचे व्यवहार, कमी वजने, जास्त बाजार शुल्क, अनधिकृत कपाती तसेच विक्रेते आणि खरेदीदार यांच्यातील वाद मिटविण्यासाठी यंत्रणेचा अभाव यासारखे अडथळे आहेत.
- नियंत्रित बाजारपेठा अनुचित व्यापार पद्धती दूर करण्यात आणि उत्पादक आणि विक्रेते दोघांसाठीही योग्य व्यवहार सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हा उतारा अनियंत्रित बाजारपेठेतील दोषांवर प्रकाश टाकतो, जसे की कमी वजने, उच्च बाजार शुल्क आणि अनधिकृत वजावटी. सरकारी देखरेखीखाली नियंत्रित केलेल्या बाजारपेठांची स्थापना केल्याने एक पारदर्शक आणि कार्यक्षम कृषी व्यापार प्रणाली तयार होते, ज्यामुळे वाजवी किमती सुनिश्चित होतात, शोषण कमी होते आणि शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही फायदा होतो.