Advertisements
Advertisements
प्रश्न
ऊन आणि सावली यांच्या प्रतीकांतून सूचित होणारे आशयसौंदर्य कवितेच्या आधारे लिहा.
उत्तर
कवी नलेश पाटील यांनी 'झाडांच्या मनात जाऊ' या कवितेमधून वसंत ऋतूतील निसर्गसौंदर्याचे चित्रण उत्कट व भावविभोर शब्दकळेतून साकारले आहे. स्वत: निसर्गाचे घटक होऊन निसर्गसौंदर्याचा कसा आस्वाद घ्यावा, हे सांगताना कवींनी वेगवेगळी व अनोखी प्रतीके वापरली आहेत. बहरलेल्या झाडाचे वर्णन करताना कवी म्हणतात की झाडाच्या फांदीवर ओळीने बसलेले पक्षी हे या वसंत ऋतूच्या बहरलेल्या मोसमांचे साक्षीदार आहेत. झाडाच्या पायथ्याशी जी सावली आहे ती उन्हावर नक्षी काढत बसली आहे. म्हणजे सूर्याची किरणे जेव्हा पानांतून झाडाखाली झिरपतात त्या वेळी पायथ्याशी पसरलेल्या सावलीत त्याची नक्षीदार पखरण होते. मग नक्षीलाच जेव्हा पंख फुटतात तेव्हा सावल्यांचेच कावळे आसमंतात उडताना दिसतात. - 'ऊन-सावलीच्या नक्षीतून निर्माण झालेले काऊ' या प्रतिमेतील ऊन सावली ही प्रतीके सजग होतात. येथे चेतनगुणोक्ती अलंकाराचा लोभसवाणा आविष्कार मनाला प्रसन्न करतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
पोपटी स्पंदनासाठी म्हणजे -
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
जन्माला अत्तर घालत म्हणजे-
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
तो फाया कानी ठेवू म्हणजे-
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू म्हणजे-
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
मी झाड होऊन तेथे, पसरीन आपुले बाहू म्हणजे -
खालील कृतींतून सूचित होणारा अर्थ कवितेच्या आधारे लिहा.
निसर्गातील घटकांच्या सोबतीने केलेली कृती |
सूचित होणारा अर्थ |
(१) कोकीळ होऊनी गाऊ... |
____________ |
(२) गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू... |
____________ |
पुढील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ.
पुढील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू.
'पोपटी स्पंदनासाठी, कोकीळ होऊनी गाऊ...' या काव्यपंक्तीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
‘डोळ्यांत झऱ्याचे पाणी’ या शब्दसमूहातील भावसौंदर्य उलगडून लिहा.
'तुम्ही झाडाच्या मनात शिरला आहात', अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा.
निसर्गातील घटक व मानवी जीवन यांचा परस्परसंबंध स्पष्ट करा.
'झाडांच्या मनात जाऊ' या कवितेचे रसग्रहण करा.